HSRP Number Plate: हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी सरकारकडून मुदतवाढ?

Last Updated:
मुंबईतील 2019 पूर्वीच्या गाड्यांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अनिवार्य, न बसवल्यास 10 हजार रुपयांचा दंड लागू शकतो, विनोद सगरे यांची माहिती.
1/7
मुंबई: तुमच्या गाडी जर 2019 पूर्वीची असेल आणि तुम्ही अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेतली नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

advertisement
2/7
ज्यांनी ही नंबरप्लेट अजूनही बसवून घेतली नाही, त्यांनी तातडीनं हे काम पूर्ण करा कारण त्यासाठी फक्त 19 दिवस शिल्लक राहिले आहेत. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या गाड्यांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट कंपल्सरी केली आहे. या प्रक्रियेसाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे.

3/7
एप्रिल, त्यानंतर 30 जून, ऑगस्ट आणि आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असं असतानाही हाय सिक्युरिटी नंबरप्लेट अजूनही लाखो गाड्यांना बसवण्यात आलेलं नाही. या सगळ्या ग्राहकांसाठी सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देणार का? तर सध्या याबाबत सरकारकडून कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.

4/7
सरकारने 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत ठेवली आहे. जर या कालावधीमध्ये काम पूर्ण केलं नाही तर 10 हजार रुपयांचा दंड बसू शकतो. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

5/7
या नंबरप्लेटच्या नावाने फसवणूक होत असल्याने अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, कोणत्याही त्रयस्थ वेबसाईटवरुन घेऊ नये असं आवाहन देखील केलं आहे. या मुदतीमध्ये जर नंबरप्लेट बसवली नाही तर 1 हजार रुपयांचा दंड लागेल आणि तुम्ही अर्जही केला नसेल तर 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.

6/7
याआधी फिटमेंट सेंटर कमी असल्याने नंबर प्लेट मिळू शकत नव्हत्या मात्र 20 पेक्षा जास्त फिटमेंट सेंटर उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक वाहनांनी हे करुन घ्यावं अन्यथा दंड भरण्यास तयार राहावं असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.

7/7
आता राहिलेल्या वाहनधारकांसाठी जानेवारी 2026 पर्यंत सरकार मुदतवाढ देणार का? हे पाहावं लागणार आहे. नंबरप्लेट बसवलेली वाहानं 40 टक्के सुद्धा नाहीत त्यामुळे दंडात्मक कारवाई करणार की मुदतवाढ देणार हे 30 नोव्हेंबरलाच समजू शकेल, मात्र त्यासाठी वाट पाहात राहिलात तर मात्र तुमचा खिसा रिकामा होईल हे नक्की दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे आताच हे काम करुन घ्या.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement