Pune News: पुण्यातून 206 किमीचा सहापदरी रस्ता, राष्ट्रीय महामार्गाची रिंग रोडला कनेक्टिव्हिटी; कसा असेल ग्रीनफिल्ड हायवे?

Last Updated:

Pune Bengaluru Greenfield Highway: पुणेकरांची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने पुणे- बंगलोर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणखी एक नवा महामार्ग सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले ट्रॅफिकचं प्रमाण पाहता सरकारने आणखी एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे.

Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाण्यासाठी 6 हजार कोटींच्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी
Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाण्यासाठी 6 हजार कोटींच्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणेसह पुणे आणि इतरत्र प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी आहे. कायमच प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा प्रश्न सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. अनेक महामार्गांचे प्रकल्प सरकार हाती घेत आहेत. आता अशातच पुणेकरांची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने पुणे- बंगलोर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणखी एक नवा महामार्ग सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले ट्रॅफिकचं प्रमाण पाहता सरकारने आणखी एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे.
पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्ग विकसीत करण्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठरवलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 699 किमीचा हा मार्ग असून महाराष्ट्रात त्याची लांबी 206 किमी इतकी असणार आहे. सहा पदरी रस्त्याचा हा प्रकल्प असून यामुळे पुणे- बेंगलोर महामार्गावर असणारा वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सहापदरी महामार्गाला अंदाजे 42 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय, रस्त्याच्या कामाला तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे. महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नव्या मार्गाच्या प्रकल्पाचा विचार केला जात आहे.
advertisement
एनएचआयने म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा ग्रीनफिल्ड महामार्ग विकसित करण्याचे निश्चित केले. नव्या ग्रीनफिल्ड महामार्गावर वाहने प्रतितास 120 किमी वेगाने धावणार असल्याचे बोलले जात आहे. 609 किमीच्या पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्गामध्ये पुण्यातील नव्या रिंग रोडचाही समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. या रिंग रोडची सुरूवात पुण्यातल्या खोपीतून केली जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील उर्से ते सातारा रस्त्यावर असलेल्या केळवडे दरम्यानचा भाग पुणे रिंगरोडचा असेल. त्याचं काम एमएसआरडीसीच्या अखत्यारित केले जाणार आहे. ह्या रिंगरोडचा भाग पुणे- बेंगलोर नव्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा भाग करण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
advertisement
दरम्यान, पुण्याचा विकास दिवसेंदिवस अधिकाधिक वेगाने होताना दिसत आहे. पुणे शहराभोवती रिंग रोड साकारण्यात येणार असून त्यासोबतच पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्ग विकसित केला जाणार आहे. त्यामुळे अविकसित क्षेत्रामधील आर्थिक विकासाला चालना मिळेल. या महामार्गावर पुणे- बेंगलोर शहराजवळ पाच किमी लांबीची तातडीचे इमर्जन्सी एअरस्ट्रिप (हेलीपॅड) तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे राज्य मार्ग आणि राष्ट्रीय मार्ग जवळच्या टोलिंग प्रणालीसह; तसेच ग्रेड सेपरेटेड इंटरचेंजसह जोडण्यात येतील. दरम्यान या सहापदरी प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ असणार असून वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यातून 206 किमीचा सहापदरी रस्ता, राष्ट्रीय महामार्गाची रिंग रोडला कनेक्टिव्हिटी; कसा असेल ग्रीनफिल्ड हायवे?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement