BMC Election Reservation: BMC सोडत: २२७ पैकी खुल्या गटासाठी फक्त ७५ जागा! दिग्गज नेत्यांचे भवितव्य टांगणीला?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Reservation : मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिकेत २२७ जागांपैकी ७५ जागा हा खुल्या गटासाठी असणार आहेत.
मुंबई: आज राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत निघणार आहे. आपला प्रभाग कायम राहावा यासाठी अनेक दिग्गजांनी देवाचा धावा केला. आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिकेत २२७ जागांपैकी ७४ जागा हा खुल्या गटासाठी असणार आहेत.
मागील काही वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आज मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची सोडत आज ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंग मंदिर सभागृहात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील २२७ जागांपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. या
advertisement
>> कशी असेल आरक्षण सोडत प्रक्रिया ?
- प्रथम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उत्तरत्या क्रमाने लोकसंख्येनेसार प्रभाग जाहीर करून महिला आणि पुरुषांचे प्रभाग जाहीर केले जातील.
- उर्वरीत २१० प्रभागांमधून मागासवर्ग प्रवर्गासाठी ५१ चिठ्या काढल्या जातील.
- या ६१ मधून प्रथम महिला आरक्षित ३१ प्रभागांच्या चिठ्या काढून उर्वरीत ३० पुरुषांचे प्रभाग जाहीर केले जातील.
advertisement
- त्यानंतर उर्वरीत १४९ प्रभागांमधून प्रथम ७४ प्रभागांमधून महिला आरक्षित प्रवर्गार्गासाठी चिठ्या काढून उर्वरीत ७५ चिठ्या खुला प्रवर्गासाठी जाहीर केल्या जातील
>> कसे असेल आरक्षण ?
> अनुसूचित जातीचे राखीव प्रवर्ग १५
- महिला प्रभाग ०८
- पुरुष प्रभाग ०७
> अनुसूचित जमाती राखीव प्रवर्ग ०२
- महिला प्रभाग ०१
advertisement
- पुरुष प्रभाग ०१
> नागरिकांचा मागासवर्ग राखीव प्रवर्ग ६१
- महिला प्रभाग ३१
- पुरुष प्रभाग ३०
> सर्वसाधारण प्रवर्ग १४९
- महिला प्रभाग ७४
- पुरुष प्रभाग ७५
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Reservation: BMC सोडत: २२७ पैकी खुल्या गटासाठी फक्त ७५ जागा! दिग्गज नेत्यांचे भवितव्य टांगणीला?


