Mumbai Metro : बापरे! मेट्रो प्रवासात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच; प्रवासी म्हणाले ...

Last Updated:

Mumbai Metro Line 2A Rust Problem : मुंबईतील दहिसर-अंधेरी मेट्रो 2अ मार्गिकेच्या गाड्यांना अवघ्या साडेतीन वर्षांतच गंज चढल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी असून एमएमआरडीएच्या देखभालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

mumbai metro news
mumbai metro news
मुंबई : मुंबई मेट्रो कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. मात्र पुन्हा एका चर्चेचे कारण ठरले ते म्हणजे दहीसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेवरील मेट्रोच्या काही छताला गंज चढल्याचे समोर आले आहे. या संबंधिचे काही फोटोज सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे गाड्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
करोडो रुपये खर्चून घेतलेल्या मेट्रो गाड्या गंजल्या
मुंबईतील दहिसर ते अंधेरी पश्चिम अशी धावणारी मेट्रो 2 अ मार्गिका ही एप्रिल 2022 मध्ये सुरू झाली होती. पण अवघ्या साडे तीन वर्षांतच या मार्गिकेतील काही मेट्रो गाड्यांच्या छताला गंज चढल्याचे समोर आले आहे. ही मार्गिका एमएमआरडीएने उभारली आहे. एमएमआरडीएनेच दहिसर ते गुंदवली दरम्यानची मेट्रो 7 मार्गिका देखील बांधली आहे. या दोन्ही मार्गिकांचे काम दोन टप्प्यांत पूर्ण झाले होते ज्यात पहिला टप्पा एप्रिल 2022 मध्ये आणि दुसरा जानेवारी 2023 मध्ये सुरू झाला होता. दोन्ही मार्गिका आता पूर्ण क्षमतेने चालू असून दररोज तीन लाखांहून अधिक प्रवासी या मेट्रो सेवेचा वापर करत आहेत.
advertisement
मेट्रोला अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सेवा मानले जाते. गाड्या सुद्धा उच्च दर्जाच्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, आता मेट्रो 2 अ मार्गिकेतील काही गाड्यांची अवस्था फक्त काही वर्षांतच खालावल्याचे दिसून येत आहे. गाडी क्रमांक M2-D027 या गाडीच्या छतावर गंज दिसल्याची माहिती समोर आली असून, इतर गाड्यांनाही तशीच समस्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
इतक्या कमी कालावधीत गाड्यांना गंज लागणे हे चिंताजनक मानले जात आहे. त्यामुळे देखभाल आणि दर्जा तपासणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक दुरुस्ती केली नाही तर गाड्यांची आणखी दुरवस्था होऊ शकते. एमएमआरडीएने या बाबत तपास सुरू करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : बापरे! मेट्रो प्रवासात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच; प्रवासी म्हणाले ...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement