कधी ‘कूल बिअर’ म्हणून ओळखलं जाणारं बीरा 91 आता कुठे गायब झाली? कुठं चुकलं या ब्रँडचं गणित?

Last Updated:
आपल्या वेगळ्या चवीमुळे, आकर्षक बाटलीच्या डिझाइनमुळे आणि “चीकू मंकी” लोगोमुळे बीरा 91 काही वर्षांतच “कूलनेस”ची ओळख बनली होती. पण आज हाच ब्रँड आर्थिक संकटात सापडला आहे.
1/6
भारतात बिअर उद्योग झपाट्याने वाढत आहे. विशेषतः तरुणांमध्ये बिअर पिण्याची संस्कृती (Beer Culture) मागील दशकात लोकप्रिय झाली आहे. या बाजारात काही वर्षांपूर्वी एक नाव सर्वांच्या ओठांवर होतं, ते म्हणजे ‘बीरा 91 (Bira 91)’.

advertisement
2/6
आपल्या वेगळ्या चवीमुळे, आकर्षक बाटलीच्या डिझाइनमुळे आणि “चीकू मंकी” लोगोमुळे बीरा 91 काही वर्षांतच “कूलनेस”ची ओळख बनली होती. पण आज हाच ब्रँड आर्थिक संकटात सापडला आहे.
आपल्या वेगळ्या चवीमुळे, आकर्षक बाटलीच्या डिझाइनमुळे आणि “चीकू मंकी” लोगोमुळे बीरा 91 काही वर्षांतच “कूलनेस”ची ओळख बनली होती. पण आज हाच ब्रँड आर्थिक संकटात सापडला आहे.
advertisement
3/6
बीरा 91चा प्रवास कसा सुरू झाला?2015 मध्ये अंकुर जैन यांनी ‘बीरा 91’ ची स्थापना केली. कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये काही पब्स चालवले. तेथेच त्यांना भारतातील बिअर बाजारातील अपार शक्यता दिसल्या. त्यांनी विचार केला भारताला आपली स्वतःची क्राफ्ट बिअर असायला हवी. सुरुवातीला बेल्जियममधून बिअर इंपोर्ट करण्यात आली, जेणेकरून चवीत आणि गुणवत्तेत फरक पडू नये. नंतर 2016 मध्ये भारतातच कंपनीची ब्रुअरी सुरू झाली.

4/6
लाइट, टेस्टी आणि कूल ब्रँडिंग असलेली ही बिअर तरुणांना प्रचंड आवडली. दिल्ली, मुंबई, गोवा आणि बेंगळुरूपर्यंत ‘बीरा 91’चे टॅप हाऊस सुरू झाले. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने तब्बल ₹824 कोटींचे उत्पन्न मिळवले. ब्रँडची किंमत $450 दशलक्ष (सुमारे ₹3700 कोटी) पर्यंत पोहोचली आणि IPO च्या चर्चा सुरू झाल्या.

5/6
संकटाची सुरुवात कशी झाली?डिसेंबर 2022 मध्ये कंपनीने आपले नाव B9 Beverages Private Limited वरून B9 Beverages Limited असे बदलले. हे IPO साठीचे पाऊल होते, पण याच बदलामुळे संकट ओढवले. भारतातील दारू उद्योग राज्यांच्या नियमांनुसार चालतो. त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी या बदलानंतर बीरा 91 ला “नवीन कंपनी” मानले. परिणामी, जुन्या परवानग्या रद्द झाल्या आणि नव्या परवानग्या घेण्यासाठी 4-6 महिने लागले. या काळात बीरा 91 ची विक्री थांबली, आणि सुमारे ₹80 कोटींचा माल राईट-ऑफ करावा लागला.

6/6
आर्थिक अडचणी आणि कर्मचारी बंडविक्री थांबल्याने कंपनीचा रोख प्रवाह (cash flow) बिघडला. 2024 मध्ये उत्पन्न ₹638 कोटींवर आले, पण तोटा ₹748 कोटींपर्यंत गेला. जुलै 2025 पासून बीयर उत्पादन पूर्णपणे थांबले. सुमारे 250 कर्मचाऱ्यांनी CEO अंकुर जैन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वेतन, PF, आणि TDS चे पेमेंट 3 ते 6 महिन्यांपर्यंत थकले. कंपनीने 700 पैकी 400 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले.

BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवा
  • भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

  • मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

  • मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.

View All
advertisement