Palghar News : आईच बनली वैरीण! 4 दिवसांच्या बाळाला उघड्यावर टाकून फरार; चिमुकलीच्या पायाला कुत्र्याने...
Last Updated:
Shocking Crime News : डहाणू उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे आपल्या 4 दिवसांच्या चिमुकलीसोबत आईने भयंकर कृत्य केलेलं आहे.
ठाणे : डहाणू उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार दिवसांच्या नवजात बालिकेच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्याने संपूर्ण रुग्णालयात खळबळ उडाली आहे. या निष्पाप बाळासोबत नेमकं काय घडलं याबाबत अद्याप गूढ कायम असून प्रकरण दिवसेंदिवस अधिकच भयावह होत आहे.
नेमकं घडलं काय?
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करताच बाळाच्या अंगावरील जखमा पाहून चिंता व्यक्त केली. बाळाच्या अंगावरील जखमा पाहता कुत्रा किंवा इतर भटक्या प्राण्याच्या हल्ल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या जखमा अपघाती आहेत की मुद्दाम केल्या गेल्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे या जखमा ताज्या नसून त्या किमान एक दिवस जुन्या असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.
advertisement
ही नवजात बालिकेला बोईसर येथून उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला या बाळाच्या आईने बाळ खाली पडल्यामुळे जखमा झाल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांनी अधिक चौकशी केली असता तिने वारंवार आपली भूमिका बदलत वेगवेगळी कारणे सांगितली. महिलेच्या गोंधळलेल्या उत्तरांमुळे संपूर्ण प्रकरणावर संशय आलेला आहे.
पोटच्या बाळासोबत आईचे धक्कादायक कृत्य
या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून बाळ नको असल्याने महिलेने नवजात बालिकेला उघड्यावर टाकल्याचा संशय आहे. लोकांनी जाब विचारल्यानंतर तिने बाळ परत आणले मात्र तोपर्यंत कुत्रा किंवा मांजरीच्या हल्ल्यात बालिका जखमी झाली. प्रकृती गंभीर असल्याने तिला वलसाड रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
advertisement
या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून निष्पाप नवजात बालिकेच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सत्य नेमके काय आहे याचा उलगडा तपासानंतरच होणार असून या धक्कादायक प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 12:07 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Palghar News : आईच बनली वैरीण! 4 दिवसांच्या बाळाला उघड्यावर टाकून फरार; चिमुकलीच्या पायाला कुत्र्याने...








