लाल किल्ला स्फोटात अमोनियम नायट्रेट, तेल आणि डेटोनेटर वापरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तीव्र धमाक्यामुळे तपास यंत्रणांनी आता अमोनियम नायट्रेटसोबत तेल (इंधन) आणि डेटोनेटरच्या वापराची शक्यता तपासायला सुरुवात केली आहे. मात्र, फॉरेन्सिक तपासणी अहवाल आल्यानंतरच या थिअरीची खात्री होईल.
एजन्सींना घटनास्थळी मागील स्फोटांप्रमाणे ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे आता तपासाचा केंद्रबिंदू अमोनियम नायट्रेट + तेल + डेटोनेटर या कॉम्बिनेशनकडे वळला आहे. फॉरेन्सिक टीम्सने काल रात्री घटनास्थळावरून नमुने घेतले असून, त्यांच्या रिपोर्टनंतरच नेमका कोणता स्फोटक पदार्थ वापरण्यात आला होता हे स्पष्ट होईल. तज्ज्ञांच्या मते, अमोनियम नायट्रेटमध्ये तेल आणि डेटोनेटर मिसळल्यास मोठा स्फोट होऊ शकतो.
जरी इलेक्ट्रिक डेटोनेटरचा वापर असू शकतो, तरी घटनास्थळी अशा कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाइसचे अवशेष सापडले नाहीत, त्यामुळे मॅन्युअल किंवा नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटरचा वापर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा नवा फोटो समोर आलाय. पार्किंगमध्ये जात असताना ही कार सीसीटीव्हीत कैद झालीय. कार ड्रायव्हर सीसीटीव्हीत कैद झालाय. याच i20कारमध्येच स्फोट झाला होता. दिल्ली स्फोटानंतर आज केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. सकाळी साडे नऊ वाजता अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुरक्षा दलाचे प्रमुख सहभागी होणार आहेत. काल अमित शाहांनी घटनास्थळावर जाऊन आढावा घेतला होता. या स्फोटाची प्रत्येक अँगलनं तपासणी होणार असल्याचं शाहांनी सांगितलं.
दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हायअलर्ट… महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ… तर संशयास्पद वाहनांची कसून तपासणी सुरू…
गृहमंत्री अमित शाहांनी दिल्ली ब्लास्टच्या ठिकाणी जाऊन घेतला आढावा… उपस्थित पोलिस कमिश्नरांनी आतापर्यंतच्या तपासाबद्दल दिली माहिती… तर शाहांनी सकाळी 9.30 वाजता बोलावली अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक…
गृहमंत्री अमित शाहांकडून दिल्ली ब्लास्टच्या चौकशीचे आदेश… दिल्ली पोलीस कमिश्नरसह इतर अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती…
दिल्ली ब्लास्टचा गुन्हा UAPA च्या आधारे होणार दाखल … सूत्रांची माहिती… NIA लाही तपास सोपवला जाण्याची शक्यता… कार पार्किंगमध्ये लावणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू…
बॉम्ब स्फोटातील कारचं पुलवामा कनेक्शन समोर… शेवटच्या वेळी पुलवामाच्या एका व्यक्तीला विकण्यात आली होती i20 कार… गुरुग्राममधील सलमानच्या नावे कारचं रजिस्ट्रेशन…
दिल्लीतील स्फोटामध्ये 9 लोकांचा मृत्यू… एका व्यक्तीची ओळख पटली … तर 20 जखमींवर उपचार सुरू… काल रात्री लाल किल्ल्याच्या समोर झाला होता स्फोट…