'गल्लीतला गुंड...', 'कालिया' म्हणत काढली लाज, लग्नाआधीच शत्रुघ्न सिन्हांच्या सासूने उतरवला माज

Last Updated:
Shatrughan Sinha Poonam Sinha Love Story : बॉलिवूडमधील एक शानदार आणि आजही तितकीच ताजीतवानी वाटणारी जोडी म्हणजे शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा. त्यांच्या लग्नाला तब्बल ४५ वर्षं झाली आहेत आणि आजही त्यांची केमिस्ट्री जबरदस्त आहे.
1/7
बॉलिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत, ज्यांना बघून खरंच जुन्या जमान्यातील ग्रेस काय असतो, ते कळतं. अशीच एक शानदार आणि आजही तितकीच ताजीतवानी वाटणारी जोडी म्हणजे शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा. त्यांच्या लग्नाला तब्बल ४५ वर्षं झाली आहेत आणि आजही त्यांची केमिस्ट्री जबरदस्त आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या लग्नाचा एक भन्नाट किस्सा सांगितला, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

advertisement
2/7
त्यांनी सांगितलं की, पूनमच्या आईला म्हणजे त्यांच्या सासूबाईंना शत्रुघ्न यांच्यासोबत पूनमचं लग्न लावून द्यायचं नव्हतं. त्यांना समजावण्यासाठी खूप वेळ लागला, पण शेवटी त्या कशाबशा तयार झाल्या. गंमत म्हणजे, शत्रुघ्न त्यांच्या कुटुंबात सर्वात लहान होते आणि अमेरिकेत राहणाऱ्या त्यांचे मोठे भाऊ राम सिन्हा यांनी हे लग्नाचं स्थळ सुचवलं होतं.

3/7
जेव्हा पूनमच्या आईने शत्रुघ्न यांचा फोटो पाहिला, तेव्हा त्यांचा पारा चांगलाच चढला. त्या संतापून म्हणाल्या,
जेव्हा पूनमच्या आईने शत्रुघ्न यांचा फोटो पाहिला, तेव्हा त्यांचा पारा चांगलाच चढला. त्या संतापून म्हणाल्या, "तुम्ही तुमच्या भावाचा चेहरा पाहिलाय का? कालिया! गल्लीतला गुंड, मूर्ख दिसतोय. माझ्या मुलीकडे पाहा. जणू काही ती दुधाने अंघोळ करतेय.
advertisement
4/7
पूनम चांदीरमानी 'मिस इंडिया' आहे. दोघांचा एकत्र रंगीत फोटो काढला, तरी तो ब्लॅक अँड व्हाईट येईल. ही तर अगदीच बेमेल जोडी आहे!
पूनम चांदीरमानी 'मिस इंडिया' आहे. दोघांचा एकत्र रंगीत फोटो काढला, तरी तो ब्लॅक अँड व्हाईट येईल. ही तर अगदीच बेमेल जोडी आहे!" मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, खरं तर आमचं लग्न व्हायलाच नको होतं, पण अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर शेवटी ते पार पडलं.
advertisement
5/7
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांच्यासोबत त्यांची पहिली भेट ट्रेनमध्ये झाली होती. शत्रुघ्न त्यावेळी पाटण्याहून एफटीआयआय (FTII) मध्ये शिकायला मुंबईला जात होते. पूनमला पाहताच त्यांना पहिल्या नजरेतच प्रेम झालं. शत्रुघ्न यांनी त्यांच्या मित्रांपासून पूनमचं रक्षणही केलं होतं, त्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरू झालं.

6/7
या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. त्यांच्या पहिल्या भेटीत ते आणि पूनम दोघेही रडले होते! खरं तर, शत्रुघ्न त्यांच्या कुटुंबात सर्वात लहान होते आणि पहिल्यांदाच घराबाहेर, एकटं होस्टेलमध्ये राहायला जात होते, म्हणून त्यांना रडू कोसळलं होतं. तर पूनम तिच्या आईकडून ओरडा खाल्ल्यामुळे रडत होती.

7/7
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की,
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, "आमच्या दोघांमध्ये एक भावनिक नातं आहे. आम्ही दोघेही खूप भावुक आहोत आणि इतक्या वर्षांच्या लग्नानंतरही आमच्या व्यक्तिमत्त्वात कोणताही बदल झालेला नाही. आजही बघा, ती रडतेय आणि मी पण!" त्यांच्या या खुमासदार किस्स्याने सगळ्यांनाच हसू आवरलं नाही. शत्रुघ्न आणि पूनम यांच्या नात्यातील ही गोड गंमत पाहून त्यांचे चाहतेही भारावून गेले आहेत.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement