Royal Enfield: आता थाटात घेऊन या घरी बुलेट, किंमत इतकी होणार कमी!

Last Updated:

मुळात ३५० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा जास्त असणाऱ्या बाईक आता महाग होणार आहे, याचा फटका तर रॉयल एनफिल्डला आहेच, पण काही गाड्या या स्वस्तही होणार आहे.   

News18
News18
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये परिणाम दिसायला लागले आहे. ऑटो सेक्टरमध्ये याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला आहे. काल पर्यंत ज्या गाड्या लाखांच्या किंमतीत विकल्या जात होत्या, त्या आता हजारांमध्ये येऊन ठेपल्या आहे. तरुणांची फेव्हरेट असलेली बुलेट अर्थात रॉयल एनफिल्ड सुद्धा आता किंमती कमी करणार आहे. मुळात ३५० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा जास्त असणाऱ्या बाईक आता महाग होणार आहे, याचा फटका तर रॉयल एनफिल्डला आहेच, पण काही गाड्या या स्वस्तही होणार आहे.
Royal Enfield Classic 350 ची किंमत स्वस्त होईल असं सांगितलं जात आहे.  पण क्लासिक ३५० आणि इतर ३५० सीसी बाईक आता अधिक परवडणाऱ्या होतील. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कार आणि बाईकसाठी नवीन जीएसटी दर जाहीर केले आहेत. जीएसटी सुधारणांनुसार, ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन असलेल्या बाईकवर आता २८% जीएसटी ऐवजी १८% जीएसटी लागेल. त्यामुळे, रॉयल एनफील्डच्या सर्व ३५० सीसी बाईक, ज्यामध्ये त्यांची सर्वाधिक विक्री होणारी बाईक क्लासिक ३५० देखील समावेश आहे, आता कमी किमतीत उपलब्ध होतील. एवढंच नाहीतर, ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या बाईक लक्झरी वस्तू म्हणून वर्गीकृत केल्या जातील आणि त्या महाग होतील.
advertisement
२२ सप्टेंबरपासून नवे दर
वाढलेल्या जीएसटी दरांमुळे या बाईक्सच्या किमती २९% ते ४०% वाढतील. जरी रॉयल एनफील्डला त्याची बहुतेक विक्री ३५० सीसी लाइनअपमधून होत असली तरी, Himalayan 450, Continental 650 आणि काही इतर लोकप्रिय हाय-एंड मोटारसायकलींमुळे ब्रँडला तोटा सहन करावा लागू शकतो. केंद्र सरकारच्या धोरणामुळे  किंमतीत सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू होतील.Royal Enfield Classic 350 ची विक्री आणखी वाढू शकते का आणि उच्च-क्षमतेच्या मोटारसायकलींची विक्री कमी होते का, हे पाहण्याचं ठरणार आहे.
advertisement
Royal Enfield Classic 350  ची किती होईल किंमत?
Royal Enfield Classic 350  ही एक रेट्रो-स्टाईलमधली बाईक आहे जी तिच्या रायडिंग फील आणि रोड प्रेझेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे. त्यात अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर्स, टाइप-सी चार्जिंग, एलईडी हेडलाइट, ड्युअल-चॅनेल एबीएस, नेव्हिगेशन पॉड आणि बरेच काही समावेश आहे. या बाईकला ३४९ सीसी इंजिनमधून पॉवर मिळते जे २०.२ बीएचपी आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करते आणि त्यात ५-स्पीड गिअरबॉक्स आहे. सध्याची रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची किंमत मुंबईत २.३४ लाख ते २.९९ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ती आता १० टक्क्यांने कमी होईल.
मराठी बातम्या/ऑटो/
Royal Enfield: आता थाटात घेऊन या घरी बुलेट, किंमत इतकी होणार कमी!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement