'कुठे झोपणार?', पहिल्याच दिवशी सोनाली राऊतचा बिग बॉसच्या घरात राडा; सागर कारंडेने बिग बॉसलाच विचारला प्रश्न
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6: आल्या आल्या तिने रितेश देशमुखला तर शॉक केलंच, पण तिने घरातील या तीन सदस्यांनाही मोठा धक्का दिला. तिच्या येण्याने आता घराचं वातावरण तापणारच हे नक्की झालं आहे.
मुंबई: बिग बॉस मराठी ६ चं पर्व अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेले कित्येक दिवस या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते त्याची दणक्यात सुरूवात झाली आहे. रितेश देशमुखच्या एनर्जेटिक परफॉर्मन्सने स्टेज दणाणून सोडलं. या सीझनमध्ये दिपाली सय्यद, सागर कारंडे आणि खानदेशचा किंग सचिन कुमावत यांची एन्ट्री झाली आहे. मात्र सर्वांचं लक्ष वेधलं ते सोनाली राऊतने. आल्या आल्या तिने रितेश देशमुखला तर शॉक केलंच, पण तिने घरातील या तीन सदस्यांनाही मोठा धक्का दिला. तिच्या येण्याने आता घराचं वातावरण तापणारच हे नक्की झालं आहे.
अभिनेत्री सोनाली राऊतने याआधी बिग बॉस हिंदीच्या सातव्या सीझनमध्ये राडे घातले होते. रितेशनेही तिच्या या अंदाजाचं खूप कौतुक केलं पण त्याच बरोबर तिला हलक्या भाषेत दमही भरला. यावेळी सोनाली म्हणाली, हिंदीचा फक्त ट्रेलर होतं, पण पूर्ण पिक्चर ६ मध्ये पाहायला मिळणार. रितेशही म्हणाला की अख्खा महाराष्ट्र हा पिक्चर पाहण्यासाठी आतुर झाला आहे. इतकंच नाही, तर तिने रितेश फ्लर्टही केलं. ती म्हणाली आता भाऊच्या धक्क्यावर मला तुम्हाला भाऊ म्हणावं लागेलं का? त्यावर रितेश म्हणाला तुम्ही मला धक्काही म्हणू शकता.
advertisement
सोनाली राऊतने घरातल्यांचं टेन्शन वाढलं
यानंतर शॉर्टकट दार निवडून सोनालीने घरामध्ये प्रवेश केला. घरात आल्यानंतर दिपाली, सागर आणि सचिन यांनी तिचं स्वागत केलं आणि तिला घरही दाखवलं. यावेळी सोनालीने त्यांना विचारलं, तुम्ही कुठे झोपणार. तिच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे कोणालाच समजलं नाही. त्यानंतर दिपाली म्हणाली आम्ही कुठेही झोपू, आम्ही कुठेही झोपू शकतो.
advertisement
advertisement
त्यानंतर दिपालीने सोनालीला बेडरूम आणि कॅप्टन रुम दाखवली त्यावर सोनाली म्हणाली मला तर कॅप्टनचाच बेड घ्यायचा आहे. दरम्यान, सागर, सचिन आणि दिपालीला सोनालीचं हे बोलणं खटकलेलं दिसतंय. सागर म्हणाला, तुम्ही कुठे झोपणार म्हणजे काय? बिग बॉसने हिला ब्रिफ दिलं नाहीय का?
सोनालीने पहिल्याच दिवसापासून सर्वांना टेन्शन द्यायला सुरूवात केली आहे. तिच्या अतरंगी कारनाम्यांमुळे घरातील इतर स्पर्धकांच्या डोक्याचा ताप वाढणार हे आता पक्क झालं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 9:38 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कुठे झोपणार?', पहिल्याच दिवशी सोनाली राऊतचा बिग बॉसच्या घरात राडा; सागर कारंडेने बिग बॉसलाच विचारला प्रश्न











