तपास यंत्रणांनी जय दुधाणेने व्यवसाय आणि मालमत्तांमध्ये अंदाजे 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जय दुधाणे हा 'पंप' जिमचा सह- मालक आहे आणि 'द बीटरूट कॅफे' चा मालक असल्याचेही वृत्त आहे. तो 'श्री स्वामी समर्थ इन्फ्रा'चा सह- मालक देखील आहे. दुधाणे जून 2025 पासून युएईमध्ये सक्रिय असलेल्या 'इंटिरियर हेवन' या इंटिरियर, एक्सटीरियर आणि रिनोव्हेशन सर्व्हिसेस कंपनीशी संबंधित आहे. FIR दाखल झाल्यानंतर लगेचच, जय दुधाणेने वेदांत प्रकल्पातील एक फ्लॅट त्याची पत्नी हर्षला पाटीलच्या नावावर ट्रान्सफर केला. लग्नाच्या आधीच जयने आपल्या पत्नीच्या नावावर फ्लॅट केला होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.
advertisement
येत्या काही दिवसांत आणखी खुलासे होऊ शकतात, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. लग्नाला 10 दिवसही पूर्ण झाले नाहीत तोच अभिनेता वादाच्या भोवऱ्यात सापडला. जयच्या अटकेमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी खळबळ उडाली. गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच, 24 डिसेंबर 2025 रोजी जयने आपली गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत असतानाच, नवऱ्याला जेलची हवा खावी लागल्याने त्याच्या पत्नीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, जय दुधाणेने आपल्या करियरची सुरुवात 'स्पिट्सविला 13' मधून केली होती, जिथे त्याने विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 'बिग बॉस मराठी 3' मध्ये तो उपविजेता ठरला. 'गडद अंधार' आणि महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' यांसारख्या मोठ्या चित्रपटांत त्याने काम केलं आहे. मात्र, आता या फसवणुकीच्या प्रकरणामुळे त्याच्या करिअरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
