परदेसी गर्ल इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा घरात वेळोवेळी पाहायला मिळतोय. 'बिग बॉस'च्या प्रेक्षकांना इरिनाचा हा अंदाज प्रचंड आवडल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात घरातील सगळेच तिला मराठी शिकवत आहेत.
( Bigg Bossमध्ये आलेली परदेसी गर्ल आधी करायची 'हे' काम, IPLशी आहे कनेक्शन )
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, अंकिता इरिनाला मालवणी भाषा शिकवताना दिसत आहे. अंकिता इरिनाला शिकवतेय,"माका सांगू नको". त्यानंतर इरिनादेखील "माका सांगू नको" म्हणते. अंकितानंतर इरिना म्हणते,"राम कृष्ण हरी". इरिनाच्या मराठी शिकण्याच्या धडपडीवर घरातील इतर सदस्य तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
त्यानंतर इरिना वैभव चव्हाणला ती "तुम्ही कसे आहात हे विचारते". त्यावर वैभव म्हणतो,"मी एकदम मस्त". त्यानंतर इरिना सूरजकडे जाते. सूरज इरिनाला त्याच्यासारखा डान्स करायला शिकवतो. इरिना सूरजला बकरी म्हणतो. . त्यावर सूरज तिला "मी शेर आहे" असं म्हणतो. त्यावर इरिना त्याला "मी किंग कोब्रा आहे" असं म्हणते.
घरातील सगळ्या सदस्यांकडून मराठीचे धडे घेत घेत इरिना थेट डिपी म्हणजेच धनंजय पोवारकडे पोहोचते. धनंजय तिला कोल्हापूरी भाषा शिकवतो. तो पहिलं वाक्य म्हणतो, सूपला शॉट. इरिनाही फुल जोशात म्हणते, सूपला शॉट. त्यानंतर डिपी कुठं चाललायस? हे दुसरं वाक्य तिला शिकवतो. ते बोलताना इरिना गडबड करते आणि म्हणते, कुत्रा चाललायस. इरिनाचं हे वाक्य डिपी पोट दुखेपर्यंत हसतो.