TRENDING:

जिथे खातात तिथेच कचाकचा भांडतात! सगळं संपलं आता चहावरून वातावरण तापलं, अनुश्री-दीपालीमध्ये जुंपली

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 च्या घरात छोट्या कारणावरूनही मोठे वाद होतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.दीपाली आणि अनुश्री यांच्यात जोरदार भांडणं पाहायला मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 6 चा शो चांगलंच रंगात आला आहे. घरात सहा आठवडे झाले आणि बरेच स्पर्धक घरातून बाहेर गेले आहेत. नुकत्याच झालेल्या इविक्शनमध्ये सचिन कुमावत आऊट झाले. त्यानंतर आता घरात पुन्हा नवा ड्रामा सुरू झाला आहे. पुन्हा एकदा घरातील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. यावेळी कारण ठरलं ते साधासा चहा. या छोट्याशा कारणावरून अनुश्री आणि दीपाली यांच्यात जोरदार वाद रंगला.
News18
News18
advertisement

सकाळीच अनुश्रीने दीपालीला, "माझ्यासाठी चहा बनवलेला हवाय मला", अशी मागणी केली. त्यावर दीपालीने शांतपणे उत्तर दिलं की तिची ड्युटी संपलेली आहे. मात्र अनुश्री तिथेच थांबली नाही. "तू बनवलं होतं ना त्यांच्यासाठी मग परत कर."

( Bigg Boss Marathi 6 : 'तू चोर आहेस चोर!' प्राजक्ता शुक्रेचा भर घरात संताप, प्रभूच्या अंगावर धावून गेला रोशन Video )

advertisement

या आग्रहानंतर दीपालीचा संयम सुटला. "ही वेळ आहे का ब्रेकफास्टची? आवाज खाली", असं म्हणत ती भडकली. अनुश्रीने त्यावर प्रतिक्रिया देत, "मी तुला फक्त चहा बनवायला सांगतेय" असं स्पष्ट केलं. पण दीपाली थेट "नाही करणार जा" असं म्हणत तिथून निघून जाणं पसंत केलं.

वाद इथेच थांबला नाही. अनुश्रीने संतापाच्या भरात "ठीक आहे, मी सगळं खराब करून टाकते टॉयलेट, बाथरूम. बघूया कोण युझ करतंय". अशी धमकी दिली. त्यानंतर ती बाथरूममध्ये जाऊन तिथे अस्वच्छता निर्माण केल्याचं दिसून आलं. या प्रकारामुळे घरातील इतर सदस्यही हैराण झाले.

advertisement

दीपालीने मात्र तिच्या भूमिकेवर ठाम राहत "जा कर" अशी प्रतिक्रिया दिली. चहासारख्या छोट्या गोष्टीवरून इतका मोठा वाद होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. पण बिग बॉसच्या घरात छोट्या कारणावरूनही मोठे वाद होतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात
सर्व पहा

घरात जिथे सगळे मिळून खातात, राहतात, अशा किचनच्याच ठिकाणी कचाकचा भांडतात. मग वातावरण अधिकच तणावपूर्ण होतं. अनुश्री आणि दीपाली यांच्यातील हा वाद पुढे आणखी वाढणार का? की दोघी शांतपणे तो मिटवणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
जिथे खातात तिथेच कचाकचा भांडतात! सगळं संपलं आता चहावरून वातावरण तापलं, अनुश्री-दीपालीमध्ये जुंपली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल