बिग बॉसमध्ये भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुखने सगळ्यांचं कौतुक केलं. पण त्याचवेळी सगळ्यांना मोठी चूक दाखवून दिली आहे. रितेश म्हणाला.सीझन सुरू होण्यापूर्वी आपण प्रेक्षकांना प्रॉमिस दिलं होतं हा सीझन गाजवणार आणि खरोखरच हा सीझन गाजतोय, वाजतोय, घराघरात पोहोचतोय. हे झालं पहिल्या आठवड्याचं पहिल्या आठवड्यात तुम्ही गाजवलं आणि दुसऱ्या आठवड्यात लाजवलं.
दुसऱ्या आठवड्यात काय काय घडलं?
राकेश बापटसोबतच्या वादानंतर अनुश्रीने प्राजक्ता शुक्रेसोबत वाद घातला आणि आता हाच वाद तिला चांगलाच महागात पडला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी तिला चांगलाच दणका दिला आहे.
प्राजक्ता आणि अनुश्री एकमेकींवर कडक शब्दात टीका करताना दिसले, अनुश्रीचे म्हणणं आहे, "आम्ही ड्युटी नाही करणार," अशा भूमिकेपासून सुरू झाले हा वाद. त्यावर प्राजक्ता म्हणाली, काय 'मूर्ख आहे यार... आणि त्यावर अनुश्री म्हणाली, 'हो मूर्ख आहे आम्ही, तुझ्यासारखे'.
Palash Smriti : स्मृती मानधनाच्या मित्राने बेडरूम कांड समोर आणल्यानंतर पलाश मुच्छलनं उचललं मोठं पाऊल
गार्डन एरियामध्ये झालेल्या भांडणांनंतर प्राजक्ताने हे सगळं दिपालीला जाऊन सांगितलं. अनुश्रीने शिव्या दिल्या असं ती सांगते. यानंतर दिपाली प्राजक्ताला याचा जाब विचारायला येते, काय गं तू शिव्या देतेस? त्यावर अनुश्री म्हणाली, आईला घेऊन आलीस तू ? प्राजक्ता म्हणाली, अक्कल आहे का तुला? बावळट...
इतकंच नाही तर, वादाच्या ओघात काही अश्या गोष्टी बोलल्या गेल्या ज्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापलं.
याआधी अनुश्रीचं राकेश बापटबरोबर देखील भांडण झालं. राकेशने मला न विचारता हात लावला यावरून तिने घरात धिंगाणा घातला. अनुश्रीने थेट राकेशच्या कॅरेक्टरवर डाऊट घेतला.
रितेशने अनुश्रीला झापलं
हा वाद इतका टोकाला गेला कीरितेश भाऊही भडकले. रितेश भाऊंनी तिला चांगलंच झापलं आहे
रितेश म्हणाला, अनुश्री मला सांगा जेव्हा प्राजक्ता दिपालीला घेऊन आल्या तेव्हा तुम्ही काय म्हणालात आईला घेऊन आलीस, जा आता बाबाला घेऊन ये. ए लक्ष इथं! भावाला आणलंय. सांगा आता काय सांगणार"
'हे बिग बॉसचं घर आहे, मस्तीत नाही शिस्तीत राहायचं', अशी तंबीच रितेशने अनुश्रीला दिली आहे.
