TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरात 'डर्टिनेस'! बाहेर पडताच सोनाली राऊतने उलगडलं मोठं सीक्रेट

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Sonali Raut : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर आल्यानंतर सोनाली राऊतने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने ती घराबाहेर का पडली यामागील वेगळंच कारण सांगितलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमध्ये घराबाहेर पडणारा दुसरा सदस्य म्हणजे सोनाली राऊत. तिसऱ्या आठवड्यात ती घराबाहेर पडली आहे. यासाठी तिचा अॅटीट्युड आणि आळशीपणा कारणीभूत असल्याचं म्हटलं जात होतं. पण तिथला डर्टिनेस तिच्या घराबाहेर पडण्याला कारणीभूत असल्याचं ती म्हणाली. हे सांगून सोनालीने बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिथलंच मोठं सीक्रेट उलगडलं आहे.
News18
News18
advertisement

सामान्यपणे बिग बॉसच्या घरातील सदस्यांचं नॉमिनेशन होतं. त्यानंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भाऊच्या धक्क्यावर त्यापैकी एका सदस्याचं एव्हिकेशन होतं. म्हणजे ते घराबाहेर पडतात.  दुसऱ्या आठवड्यात राधिका पाटीलनंतर तिसऱ्या आठवड्यात सोनाली राऊतचा नंबर लागला. बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर आल्यानंतर सोनाली राऊतने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने ती घराबाहेर का पडली यामागील नेमकं कारण सांगितलं आहे.

advertisement

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना सोलते ती तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी 6' सोडणार, स्वत:च घराबाहेर पडण्याचा निर्णय; कारण काय?

सोनाली म्हणाली, मी म्हणाले होते की मी फायनलपर्यंत पोहोचणार आणि ट्रॉफी मला मिळणार. पण माझ्या हेल्थवर आलं. माझ्या हेल्थबाबत कॉम्प्रोमाइझ झालं. म्हणून मला शोमधून निघावं लागलं.

सोनाली राऊतला नक्की काय झालं?

advertisement

सोनालीने सांगितलं की, मी घरात गेल्यानंतर तिसऱ्या दिवशीपासूनच मला इन्फेक्शन सुरू झालं. दुसऱ्या दिवसापासून ते पसरू लागली. सुरुवातीला बटवर आलं मग मांड्यापर्यंत पोहोचलं. नंतर हातावरही आलं. तेव्हा मी पॅनिक मूडमध्येच होते. तिथं डॉक्टरही आले होते. त्यांनी मला सांगितलं की चांगलं खा, चांगलं राहा. पण जेव्हा आपण बिग बॉसच्या घरात असतो. तेव्हा आपण चांगलं राहणार आणि खाणार हे शक्य नसतं. कारण हा टास्क बेस आणि मेंटल स्ट्रेंथचा शो आहे. मी डॉक्टरांना विचारलं पण तेही काही करू शकत नव्हते. ते मला औषधंही देत होते पण ते कंट्रोलमध्ये येत नव्हतं. मग मला ते टीमला सांगावाच लागलं.

advertisement

एकंदर काय तर हायजिन म्हणजे अस्वच्छतेचं कारण देत सोनालीने बिग बॉसच्या घरात अस्वच्छता म्हणजेच डर्टिनसे असल्याचं सांगितलं. सोनालीने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

शेणाचा टास्क खेळण्यास सोनालीने दिला होता नकार

सोनालीने शेणाच्या टास्कमध्ये अंगावर शेण पाडून घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर सोनालीला रितेश देशमुखनं खूप झापलं होतं. रितेश सोनालीला म्हणाला, "सोनाली तुम्ही ठरवलं त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभे नाही राहणार. तुम्ही आलाच कशाला इथे, टास्क खेळायला आलात ना तुम्ही."

Rohit Shetty : दिग्दर्शक रोहित शेट्टीला संपवण्यासाठीच गोळीबार, खळबळजनक माहिती समोर; कारण काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

त्यावर सोनाली म्हणाली, "मला जे वाटलं ते मी केलं." त्यावर रितेश तिला म्हणाला, "ओ एक मिनिट, हा अँटिट्यूड घरी ठेवा, या घरात नाही. इथे सगळे सारखे आहेत. यावेळी नॉमिनेट केलंय पुढच्या वेळेस घराबाहेर काढेन." असं म्हणत तिला थेट नॉमिनेट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता घराबाहेर पडण्याचा दुसरा नंबर सोनालीचाच आहे, असा अंदाज सगळ्यांनी बांधला आणि तो खरा ठरला. सोनालीच घराबाहेर झाली.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरात 'डर्टिनेस'! बाहेर पडताच सोनाली राऊतने उलगडलं मोठं सीक्रेट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल