TRENDING:

Black Warrant म्हणजे नेमकं काय? Netflix च्या 'या' क्राइम थ्रिलर सिरिजने उडवलीय खळबळ

Last Updated:

Black Warrant on Netflix: नेटफ्लिक्सवर नुकतीच एक सीरिज चर्चेत आहे ज्याचं नाव 'ब्लॅक वॉरंट'. या वेब सिरिजमुळे 'ब्लॅक वॉरंट' हा शब्द ट्रेंड होत असून याचा नेमका अर्थ काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ओटीटीवर अनेक मूव्ही-सिरिजचा दबदबा पहायला मिळतो. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळलेले पहायला मिळतात. क्राइम, हॉरर, थ्रिलर, मिस्ट्री, कॉमेडी, रोमान्स अशा धाटणीचे मूव्ही-सीरिज चर्चेत असतात. नेटफ्लिक्सवर नुकतीच एक सीरिज चर्चेत आहे ज्याचं नाव 'ब्लॅक वॉरंट'. या वेब सिरिजमुळे 'ब्लॅक वॉरंट' हा शब्द ट्रेंड होत असून याचा नेमका अर्थ काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
Black Warrant म्हणजे नेमकं काय?
Black Warrant म्हणजे नेमकं काय?
advertisement

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली 'ब्लॅक वॉरंट' ही सिरिज सध्या खूप चर्चेत आहे. ही ट्रेंडिंग सीरीज एका 'ब्लॅक वॉरंट' या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये तिहार जेलमधील वास्तव दाखवण्यात आलंय. यामध्ये कैदी लोक जेलमध्ये कसे राहतात आणि त्यांचं जीवन कसं असतं? याची रिअॅलिटी दाखवली आहे.

Black Warrant: Netflix ची 'ही' सीरिज पाहण्यासाठी 'जेल'मध्ये जावं लागेल, Review वाचून ठरवा पाहायची की नाही?

advertisement

ब्लॅक वॉरंटचा अर्थ काय?

ब्लॅक वॉरंट हे जेलमधील कैदीसाठी असतं. ज्या कैदींना फाशीची शिक्षा मिळते त्यांना हे वॉरंट जारी केलं जातं. यालाच डेथ वॉरंट असेही म्हणतात. या वॉरंटमध्ये दोषींचं नाव आणि फाशीची शिक्षा देण्याची वेळ लिहिलेली असते. याच ब्लॅक वॉरंटवर आधारित नेटफ्लिक्सवर सिरीज आहे जी खूप चर्चेत आहे.

'ब्लॅक वॉरंट' वेब सिरिज कशावर आधारित?

advertisement

विक्रमादित्य मोटवानी आणि सत्यांशू सिंह यांनी डायरेक्ट केलेली ही 'ब्लॅक वॉरंट' सीरिज एकूण सात भागांची आहे. प्रत्येक भाग 40 ते 50 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये 80 च्या दशकातील तिहार जेलची अवस्था आणि भयानक वास्तव दाखवण्यात आलं आहे. तुरुंगातील राजकारणापासून ते तुरुंगातील भ्रष्टाचार आणि तुरुंगातील अन्न, कैद्यांपासून ते अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत सगळंच दाखवण्यात आलं आहे.

advertisement

नेटफ्लिक्सची 'ब्लॅक वॉरंट' ही सिरिज दिल्लीतील तिहार जेलमधील माजी जेलर सुनील गुप्ता यांच्यावर आहे. ज्यांनी आपलं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य त्याच जेलमध्ये जेलर बनून काढलं. सिरिजमध्ये सुरुवातीला त्यांचं स्ट्रगल दाखवण्यात आलं आहे. त्याचे आणखी दोन साथी असतात शिवराज सिंह मंगट आणि विपिन दहिया. हे तिघेही मिळून या जेलची जबाबदारी सांभाळत असतात. या तिघांच्याही वेगळ्या टीम असून त्या धर्म आणि जात यांच्यावरून वाटलेल्या असतात. जेलरवर अशा जेलची जबाबदारी असते जिथे खूप खतरनाक कैदी असतात जे सतत भांडण, वाद आणि चुकीचं वागत असतात. जेलचा हा माहौल सुधारताना सुनील गुप्ता यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याचं भयानक वास्तव दाखवलं आहे.

advertisement

'ब्लॅक वॉरंट' कास्ट

'ब्लॅक वॉरंट'ची कहाणी तर उत्कृष्ट आहेच याशिवाय त्याची कास्टही दमदार आहे. राहुल भट, जहान कपूर, अनुराग ठाकुर, परमवीर सिंह, सिद्धांत गुप्ता, प्रताप फड, विनय शर्मा अशी तगडी कास्ट या सिरिजमध्ये आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

'ब्लॅक वॉरंट' सिरिज पाहताना तुम्ही जेलमध्ये असल्याचा भास होतो. तुम्हीही त्याच वास्तवात जगत असल्याचा भास होतो. प्रत्येक भाग खिळवून ठेवणारा आणि उत्सुकता वाढवणारा आहे. तिहार जेलचं भयानक आणि थरारक वास्तव प्रेक्षकांना हादरवून सोडतं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Black Warrant म्हणजे नेमकं काय? Netflix च्या 'या' क्राइम थ्रिलर सिरिजने उडवलीय खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल