Black Warrant: Netflix ची 'ही' सीरिज पाहण्यासाठी 'जेल'मध्ये जावं लागेल, Review वाचून ठरवा पाहायची की नाही?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Black Warrant Review: एक सीरिज नेटफ्लिक्सवर धडकली आहे जिने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये Netflix तर टॉपमध्ये आहे. अनेक ट्रेंडिंग मूव्ही-सिरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध असतात. अशातच एक सीरिज नेटफ्लिक्सवर धडकली आहे जिने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपण बोलत असलेला ही ट्रेंडिंग सीरिज आहे 'ब्लॅक वॉरंट'. जिने सध्या ओटीटीवर धुमाकूळ घातला असून सोशल मीडियावरही तिचा दबदबा पहायला मिळतोय.
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली 'ब्लॅक वॉरंट' ही सिरिज सध्या खूप चर्चेत आहे. ही ट्रेंडिंग सीरीज एका 'ब्लॅक वॉरंट' या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये तिहार जेलमधील वास्तव दाखवण्यात आलंय. यामध्ये कैदी लोक जेलमध्ये कसे राहतात आणि त्यांचं जीवन कसं असतं? याची रिअॅलिटी दाखवली आहे.
advertisement
'ब्लॅक वॉरंट' वेब सिरिज कशावर आधारित?
नेटफ्लिक्सची 'ब्लॅक वॉरंट' ही सिरिज दिल्लीतील तिहार जेलमधील माजी जेलर सुनील गुप्ता यांच्यावर आहे. ज्यांनी आपलं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य त्याच जेलमध्ये जेलर बनून काढलं. सिरिजमध्ये सुरुवातीला त्यांचं स्ट्रगल दाखवण्यात आलं आहे. त्याचे आणखी दोन साथी असतात शिवराज सिंह मंगट आणि विपिन दहिया. हे तिघेही मिळून या जेलची जबाबदारी सांभाळत असतात. या तिघांच्याही वेगळ्या टीम असून त्या धर्म आणि जात यांच्यावरून वाटलेल्या असतात. जेलरवर अशा जेलची जबाबदारी असते जिथे खूप खतरनाक कैदी असतात जे सतत भांडण, वाद आणि चुकीचं वागत असतात. जेलचा हा माहौल सुधारताना सुनील गुप्ता यांना कोण-कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याचं भयानक वास्तव दाखवलं आहे.
advertisement
विक्रमादित्य मोटवानी आणि सत्यांशू सिंह यांनी डायरेक्ट केलेली ही 'ब्लॅक वॉरंट' सीरिज एकूण सात भागांची आहे. प्रत्येक भाग 40 ते 50 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये 80 च्या दशकातील तिहार जेलची अवस्था आणि भयानक वास्तव दाखवण्यात आलं आहे. तुरुंगातील राजकारणापासून ते तुरुंगातील भ्रष्टाचार आणि तुरुंगातील अन्न, कैद्यांपासून ते अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत सगळंच दाखवण्यात आलं आहे.
advertisement
'ब्लॅक वॉरंट' कास्ट
'ब्लॅक वॉरंट' ची कहाणी तर उत्कृष्ट आहेच याशिवाय त्याची कास्टही दमदार आहे. राहुल भट, जहान कपूर, अनुराग ठाकुर, परमवीर सिंह, सिद्धांत गुप्ता, प्रताप फड, विनय शर्मा अशी तगडी कास्ट या सिरिजमध्ये आहे.
'ब्लॅक वॉरंट' सिरिज पाहताना तुम्ही जेलमध्ये असल्याचा भास होतो. तुम्हीही त्याच वास्तवात जगत असल्याचा भास होतो. प्रत्येक भाग खिळवून ठेवणारा आणि उत्सुकता वाढवणारा आहे. तिहार जेलचं भयानक आणि थरारक वास्तव प्रेक्षकांना हादरवून सोडतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2025 3:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Black Warrant: Netflix ची 'ही' सीरिज पाहण्यासाठी 'जेल'मध्ये जावं लागेल, Review वाचून ठरवा पाहायची की नाही?






