TRENDING:

Aashram Season 4 Release Date: 'पाताल लोक 2' चीही घोषणा झाली, पण 'आश्रम 4' चं काय? पाहा सगळ्या डिटेल्स

Last Updated:

Aashram Season 4 Release Date: बॉबी देओलच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरिज आश्रमचा चौथा सीझन येत आहे आणि लवकरच तुम्हाला तो Amazon Prime Video वर पाहता येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या काही वेब सीरिजमधील प्रसिद्ध वेब सीरिज म्हणजेच आश्रम. या सीरिजचे तीन सीझन तुफान हिट झाले. चौथा सीझन देखील प्रतिक्षेत आहे. 2025मध्ये आश्रम 4 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं म्हटलं जात आहे. तरीही प्रेक्षकांना आश्रम 4 बाबत अनेक प्रश्न आहेत. दरम्यान पाताल लोक सीझन 2ची ही घोषणा करत रिलीज डेटही सांगितली पण आश्रम 4ची अद्याप कोणतीही चर्चा नाही.  पाहूयात आश्रम 4 च्या सगळ्या डिटेल्स.
आश्रम 4
आश्रम 4
advertisement

2020 मध्ये, बॉबी देओल प्रकाश झा दिग्दर्शित आश्रम या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. ही मालिका इतकी आवडली की आणखी दोन भाग करण्यात आले आणि आता तिच्या चौथ्या भागाची बातमी समोर आली आहे. बॉबी देओलच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरिज आश्रमचा चौथा सीझन येत आहे आणि लवकरच तुम्हाला तो Amazon Prime Video वर पाहता येईल.

advertisement

( Pushpa 2 OTT Release: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' OTT वर रिलीज होणार नाही? समोर आली मोठी अपडेट )

2023 मधील सुपरहिट चित्रपट एनिमलमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसलेल्या बॉबी देओलकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. बॉबीचे 'हाऊसफुल 5' आणि 'थलपथी 69' हे दोन चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. नवीन वर्षात त्याची सुपरहिट मालिका 'आश्रम 4'ही येणार असल्याची चर्चा आहे.

advertisement

2022 मध्ये वेब सीरिज आश्रम 4 संदर्भात एक घोषणा होती. मात्र त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. जागरणच्या मते, बॉबी देओलच्या आश्रम 4 या वेब सीरिजसाठी चाहते खूप उत्सुक आहेत आणि आता ही मालिका 2025 मध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहावी लागेल. 'आश्रम 4' चा 1 मिनिटाचा टीझर 2022 मध्ये रिलीज झाला होता, ज्यावरून मालिकेचा चौथा भाग येणार असल्याचे दाखवण्यात आले होते, परंतु त्याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

advertisement

'आश्रम'चे सगळे एपिसोड कुठे बघायचे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

2020 मध्ये, प्रकाश झा यांनी MX Player वर ‘आश्रम’ मालिकेचा पहिला सीझन आणला. यानंतर 2022 पर्यंत एकूण तीन भाग आले. जे तुम्ही MX Player वर पाहू शकता. जे आता Amazon MX Player झाले आहे. चौथ्या भागाची अधिकृत घोषणा 2022 मध्येच झाली होती आणि आता तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल कारण 'आश्रम 4' ची अंतिम रिलीज तारीख 2025 मध्ये येऊ शकते.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Aashram Season 4 Release Date: 'पाताल लोक 2' चीही घोषणा झाली, पण 'आश्रम 4' चं काय? पाहा सगळ्या डिटेल्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल