बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री बिपाशा बसू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण तिचा एखादा नवा चित्रपट नाही, तर तिचा एक व्हिडिओ जो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बिपाशाचा लूक पाहून तिला ओळखणंच कठिण झालं. तिला पाहून चाहते तर शॉक झाले.
बिपाशा बसूचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, ती एका साध्या लुकमध्ये, काळ्या लेगिंग्ज आणि निळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. ती गाडीच्या दिशेने चालत असते आणि अचानक तिला पॅपराझी दिसतात. पॅप्स दिसल्यावर थोडीशी ती गडबडते.
advertisement
पतीचा अत्याचार, सेक्रेटरीही उचलायचा हात; बॉलिवूडच्या 'ट्रॅजेडी क्विन'चा भयानक शेवट!
बिपाशाने 2022 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी एक खास अनुभूती असते आणि या प्रवासात शरीरात काही बदल होणे अगदी नैसर्गिक आहे. बिपाशाच्या शरीरातही असेच काही बदल झाले आहेत. तिचं वजन वाढलं आहे ,पण तिचा आत्मविश्वास तसाच ठाम आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर काहींनी तिला ट्रोल केलं. पण अशा टीकांना बिपाशाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. उलट, तिचा शांत आणि आत्मविश्वासपूर्ण वावर बऱ्याच चाहत्यांच्या मनाला भिडला आहे. काही युजर्सनी म्हटले, “आई होणं ही नायिकेपणाहून मोठी भूमिका आहे”, “बिपाशा अजूनही आपल्या सौंदर्यात खुलून दिसते”, तर काहींनी तिच्या फिटनेस प्रवासाला बळ देणाऱ्या कमेंट्स केल्या.
दरम्यान, ‘अजनबी’, ‘जिस्म’, ‘राज’, ‘बचना ए हसीनो’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम करून बिपाशा बसूने आपली ओळख निर्माण केली होती. तिची फिगर, स्टाईल आणि आत्मविश्वास हे तिचं वैशिष्ट्य होतं. आता ती आई झाली असली तरी तिचा आत्मविश्वास कायम आहे. ग्लॅमरच्या पलीकडेही एक आयुष्य असतं, हे बिपाशाने आपल्या वागण्याने सिद्ध केलं आहे.