'बॉर्डर २' ने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली?
अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर २' हा जे.पी. दत्ता यांच्या १९९७ च्या ब्लॉकबस्टर 'बॉर्डर' चा सिक्वेल आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. रविवारी'बॉर्डर २' ने शनिवारच्या कमाईपेक्षाही अधिक कमाई केली.'बॉर्डर २' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने २१.६७ टक्क्यांनी वाढ करून ३६.५ कोटींची कमाई केली.
advertisement
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार,'बॉर्डर २' ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ४९.३२ टक्क्यांची वाढ नोंदवत ५४.५ कोटींची कमाई केली.'बॉर्डर २' ची तीन दिवसांची एकूण कमाई आता १२१ कोटींवर पोहोचली आहे.
'धुरंधर' चे एक नाही तर दोन रेकॉर्ड मोडीत...
'बॉर्डर २' ला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. पहिल्या आठवड्याच्या त्याने 'धुरंधर'ला मागे टाकले. धुरंधरने त्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी १०६.५ कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, 'बॉर्डर २' ने १२१ कोटी कमाई करून हा विक्रम मोडला.
पहिल्या रविवारी, बॉर्डर २ ने ५४.५ कोटी कमाई केली, धुरंधरच्या पहिल्या रविवारी ४४.८० कोटींच्या कलेक्शनला मागे टाकले.
