हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, देव आनंद यांचा जुहू येथील बंगला एका रिअल इस्टेड कंपनीला विकण्यात आला आहे. बंगल्याचं डिल झालं असून आता पुढील कागदोपत्री कारवाई सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देव आनंद यांचा जुहू येथील आलिशान बंगला तब्बल 400 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे.
हेही वाचा - Antilia मधील बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला किंग खान, कुटुंबासोबत पहिल्यांदा आला मीडियासमोर
advertisement
मुंबईतील जुहू हा भाग बॉलिवूड सेलिब्रेटींच्या राहण्याचं एक मुख्य ठिकाण आहे. अनेक मोठे सेलिब्रेटी आणि बिझनेसमन या भागात राहतात. देव आनंद यांचा हा बंगला अनेक मोठ्या बिझनेसमन लोकांच्या बंगल्यांमध्ये होता. देव आनंदच्या अपार्टमेंटच्या आजूबाजूला अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि डिंपल कापाडिया हे कलाकार देखील राहिले आहेत. जुहूतील अगदी प्राइम लोकेशनवर हा बंगला आहे.
म्हटलं जात आहे की, देव आनंद यांनी हा बंगला जेव्हा बनवला तेव्हा तो इतका प्रसिद्ध नव्हता. त्या एरियात फार कोणी राहत नव्हतं. मोठा जंगलाचा परिसर तिथे होता. पण आज तो एरिओ जुहूमधील सर्वात पॉश एरिया झाला आहे. देव आनंद यांनी त्याच्या वयाची जवळपास 40 वर्ष या बंगल्यात घालवली आहेत. त्यांच्या मृत्यू 2011 साली झाला. मृत्यूच्या काही वर्षांनी त्यांचा हा आलिशान बंगला ओस पडूलागला होता. कारण त्याचा मुलगा सुनील आनंद हा यूएसमध्ये राहतो. तर मुलगी देवीना आपल्या आईबरोबर ऊटी येथे राहते. त्यामुळे मुंबईतील हे आलिशान घर अनेक वर्ष रिकामी आहे. याच कारणामुळे त्यांनी त्यांनी बंगला विकण्याचा निर्णय घेतला.
