दीपिका कक्कर भावूक!
दीपिका कक्करला यावर्षी मे महिन्यात स्टेज 2 लिव्हर कॅन्सर असल्याचं समजलं होतं. पोटदुखीमुळे रुग्णालयात गेल्यानंतर दीपिकाला कळाले की तिच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉल आकाराचा एक ट्यूमर आहे. या आजारामुळे फक्त तिचं आयुष्यच बदललं नाही, तर मानसिक आणि शारीरिक दृष्टिने तिला फार संघर्ष करावा लागला. दीपिका सध्या तिच्या व्लॉग्सच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या आरोग्याविषयीचे अपडेट्स देत आहे. अलीकडेच व्लॉगमध्ये तिने सांगितले की, आता तिला उपचारांच्या दुष्परिणामांची सवय झाली आहे, पण जास्त प्रमाणात केस गळत असल्यामुळे तिला भीती वाटत आहे.
advertisement
हिरोईनही तीच आणि व्हिलनही, मराठी टेलिव्हिजनवर आता चेटकीण येणार, हॉरर प्रोमो पाहिलात!
दीपिका म्हणाली,"आज संपूर्ण दिवस मी आराम केला कारण मला खूप उदास वाटत होतं. उपचारांचे दुष्परिणाम असतात, पण आता मला त्याची सवय झाली आहे. केस गळणे खूप भयानक आहे. जेव्हा मी अंघोळ करून येते, तेव्हा 10-15 मिनिटे शांत बसते, कोणाशी बोलत नाही. हा माझ्यासाठी खूप कठीण काळ असतो." कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या दीपिकाने तिच्या जिद्दीने आणि धैर्याने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. तिने पुढे सांगितले की, तिने शोएबच्या व्लॉगमध्ये तिचे अलीकडील मेडिकल रिपोर्ट्सही शेअर केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, तीन महिन्यांनंतर केलेल्या ट्यूमर मार्कर टेस्ट आणि लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) चे रिपोर्ट्स ठिक आहेत. ट्यूमर मार्कर चांगले आहेत, म्हणून डॉक्टरांनी सध्या एफएपीआय स्कॅन टाळले असून दोन महिन्यांनी पुन्हा करण्याचा सल्ला दिला आहे.
पाहा व्हिडीओ :
दीपिकाला कॅन्सरबद्दल कसं कळलं?
दीपिकाचा कॅन्सरचा त्रास मे महिन्यात पोटदुखीमुळे सुरू झाला. तपासणीनंतर तिला लिव्हर कॅन्सर असल्याचे समोर आले. त्यामुळे अभिनेत्रीला आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावनिक होत लिहिलं होतं,""पोटाच्या वरच्या भागात वेदना होत होत्या म्हणून रुग्णालयात गेले आणि नंतर कळाले की लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा एक ट्यूमर आहे… आणि नंतर समजले की हा स्टेज 2 कॅन्सर आहे… हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता."
जून महिन्यात अभिनेत्रीची 14 तासांची शस्त्रक्रिया झाली, जी अत्यंत गुंतागुंतीची होती.
कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता
दिपीकाचा पती शोएब इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिये नंतर दीपिकाच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी नाहीत. मात्र, डॉक्टरांनी स्पष्ट केले की, ट्यूमर खूप आक्रमक होता आणि तो पुन्हा येण्याची शक्यता अजूनही आहे. त्यामुळे दीपिकाने नियमित तपासणी आणि काळजी घेणे आवश्यक आहे. दीपिका सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये शेवटची दिसली होती. मात्र या कार्यक्रमादरम्यान तिच्या हाताला दुखापत झाली आणि तिला कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे गौरव खन्ना त्यावेळी हा कार्यक्रम जिंकला.