TRENDING:

Disha Patni House Firing Case : UP पोलिसांचा 'योगी पॅटर्न', दिशाच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्यांचा 5 व्या दिवशी 'गेमओव्हर', इथं झाला एन्काऊंटर!

Last Updated:

स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) नोएडा युनिट आणि सीआय युनिट, दिल्ली यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन्ही गुन्हेगारांना ठार मारण्यात आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उत्तर प्रदेश अर्थात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडक भूमिकेमुळे कायम चर्चेत राहिला आहे. गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवणे असो किंवा कुख्यात गँगस्टरचा एन्काऊंटर असो, उत्तर प्रदेश पोलिसांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. अशातच आता  बरेली येथील बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन जणांचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.  गोळीबारात सहभागी असलेले दोन्ही गुन्हेगार चकमकीत ठार झाले आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा पटनीच्या घरी  गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली आहे. रोहतक येथील रहिवासी कल्लूचा मुलगा रवींद्र आणि सोनीपत येथील गोहाना रोड येथील रहिवासी राजेंद्रचा मुलगा अरुण अशी. स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) नोएडा युनिट आणि सीआय युनिट, दिल्ली यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन्ही गुन्हेगारांना ठार मारण्यात आलं.

कुठे झालं एन्काऊंटर

advertisement

गाझियाबाद येथील टेक्नो सिटीमध्ये ही चकमक झाली. गुन्हेगार रोहित गोदारा हा गोल्डी ब्रार टोळीचा सक्रिय सदस्य होता. रवींद्र अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. घटनास्थळावरून एक घड्याळ, एक जिगाना पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला. दोन्ही गुन्हेगारांवर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होतं.

पाच पथकं होती तैनात

दिशा पटानीच्या घरावर दोन दिवसांत हा दुसरा हल्ला होता. पहिला गोळीबार ११ सप्टेंबर रोजी पहाटे ४:३३ वाजता झाला, तर दुसरी घटना १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता घडली. आतापर्यंत या गोळीबार प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचा तपास करण्यासाठी पाच पोलिस पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान, गुंड रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार यांच्या व्हायरल पोस्ट आणि ऑडिओ रेकॉर्डिंगचाही समावेश करण्यात आला होता.

advertisement

म्हणून केला होता दिशाच्या घरी गोळीबार

रोहित गोदरा याने गोळीबाराचं वर्णन ट्रेलर म्हणून केलं होतं. त्याच्या पोस्टमध्ये रोहित गोदरा याने, खुशबू पटानीमुळे हा हल्ला करण्यात आला. खुशबूने प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराजांवर टिप्पणी केली होती आणि हा त्याचा बदला होता. रोहित गोदराच्या व्हायरल पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, "जो कोणी आमच्या धर्माविरुद्ध आणि संतांविरुद्ध बोलेल त्याच्या घरी हल्ला केला जाईल. त्याने आमच्या सनातन धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या पूज्य देवतांचा अपमान सहन करणार नाही. हे फक्त एक ट्रेलर होतं."

advertisement

दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. माझी  मुलगी अशा धमक्यांना घाबरत नाहीत. माझी मुलगी हिंदू धार्मिक नेत्यांविरुद्ध केलेल्या विधानांवर ठाम आहे. तिचं विधान विकृत केलं गेलंय'.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Disha Patni House Firing Case : UP पोलिसांचा 'योगी पॅटर्न', दिशाच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्यांचा 5 व्या दिवशी 'गेमओव्हर', इथं झाला एन्काऊंटर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल