दिव्या श्रीधर आणि अभिनेता ख्रिस वेणुगोपाल यांनी 30 ऑक्टोबर रोजी मल्याळी रितीरिवाजांनुसार लग्न केले.2 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होते. आता एक रील व्हायरल होत आहे, जो आतापर्यंत 79 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एका रोमँटिक गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत. दिव्या खूप आनंदी दिसत आहेत.
( Guess Who : 8 वर्षांचं करिअर, 15 सुपरहिट चित्रपट, 28 वर्षाची साऊथ सुंदरी आज कोट्यवधींची मालकीण )
advertisement
कपलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत दिव्या श्रीधरने त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलंय, “आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार”
दिव्या श्रीधर आणि ख्रिस वेणुगोपाल यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची झाल्यास दोघेही मल्याळम आणि तमिळ टीव्ही इंडस्ट्रीतील मोठे कलाकार आहेत. दिव्याने निगेटिव्ह भूमिका करून लोकप्रियता मिळवली. दिव्या श्रीधरचे हे दुसरे लग्न आहे. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुलेही त्यांच्या लग्नाला हजर होती. अभिनेता असण्यासोबतच ख्रिस एक वकील, मोटिव्हेशनल स्पीकर आणि लेखक देखील आहे.