TRENDING:

Asen Me Nasen Me प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला मराठी नाटकाची भुरळ, 'असेन मी नसेन मी' नाटक पाहिल्यानंतर अभिनेत्री काय म्हणाली?

Last Updated:

परेश रावल, दिलीप जोशी आणि रत्ना पाठक या सेलिब्रिटींनी नीना कुळकर्णी आणि अमृता सुभाषच्या 'असेन मी नसेन मी' नाटकाचे कौतुक केल्यानंतर आणखी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला मराठी नाटकाची भुरळ पडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मराठी रंगभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या धाटणीचे विषय प्रेक्षकांना नाटकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मराठी नाटकाचा चाहतावर्ग आता फक्त मराठीतच राहिले नसून इतर भाषांमध्येही नाटकाचा चाहतावर्ग पाहायला मिळत आहे. मराठी सेलिब्रिटींनंतर आता बॉलिवूड सेलिब्रिटीही नाटकातल्या कलाकारांचे कौतुक करताना दिसत आहेत. परेश रावल, दिलीप जोशी आणि रत्ना पाठक या सेलिब्रिटींनी नीना कुळकर्णी आणि अमृता सुभाषच्या 'असेन मी नसेन मी' नाटकाचे कौतुक केल्यानंतर आणखी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला मराठी नाटकाची भुरळ पडली आहे. नेमकी ही अभिनेत्री कोण आहे? तिने 'असेन मी नसेन मी' नाटकाबद्दल काय म्हटलंय? जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला मराठी नाटकाची भुरळ

मराठी नाटकाची भूरळ पडलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ती विद्या बालन आहे. अलीकडेच विद्या बालनने मराठी नाटक पाहिलं. मराठी नाटक पाहिल्यानंतर अभिनेत्रीने तिची सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिलेली आहे. नीना कुळकर्णी आणि अमृता सुभाषचं 'असेन मी नसेन मी' नाटक पाहिल्यानंतर विद्या बालनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमृता सुभाषने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर विद्या बालनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. सध्या अभिनेत्रीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. सध्या मराठी नाटकाचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केले जात आहे. मराठी नाटकासाठी प्रेक्षकवर्गांची संख्या आता दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे.

advertisement

विद्या बालनची प्रतिक्रिया

अमृता सुभाषने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विद्या बालन म्हणते की, " काय सांगू, मला काही समजत नाहीये, नाटक पाहताना मी खूपच रडले. खरोखर खूप सुंदर मराठी नाटक आहे. ज्या पद्धतीने नाटकाचे कथानक पुढे पुढे सरकत होते, ज्या पद्धतीने नाटकाची मांडणी केली, त्यामध्येच प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळेल. मुख्य गोष्ट म्हणजे, हे नाटक तुम्हाला हसता हसता रडवेल आणि रडवता रडवता हसवेल. हा बॅलेन्स दिग्दर्शकांनी खूप उत्तम पद्धतीने सांभाळला आहे. खरोखर मी सर्व कलाकारांचा अभिनय पाहून फार थक्क झालेय. सर्व कलाकारांचे अभिनय फार अप्रतिम होते. माझ्याकडे सध्या बोलायला शब्दच नाही. नाटक पाहिल्यानंतर शब्दही कमी पडत आहेत. जर तुम्ही हे नाटक नसेल पाहिलं, तर आवर्जुन पाहा. दमदार आशय- विषय असलेलं हे नाटक आहे. जाता जात मी हेच सांगेल."

advertisement

'असेन मी नसेन मी' नाटकाविषयी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘उद्यानाचा निधी खर्च होत नाही’, शिवप्रेंमींवर आली भीक मागण्याची वेळ, काय घडलं?
सर्व पहा

'असेन मी नसेन मी'या नाटकामध्ये अभिनेत्री नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या मराठी इंडस्ट्रीतल्या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाला आतापर्यंत 22 पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे 8 पारितोषिके, अखिल भारतीय नाट्य परिषदाचे 4 पारितोषिके, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सारख्या पुरस्कारांचा यात समावेश आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Asen Me Nasen Me प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला मराठी नाटकाची भुरळ, 'असेन मी नसेन मी' नाटक पाहिल्यानंतर अभिनेत्री काय म्हणाली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल