तृतीयपंथी अभिनेत्री प्रणित हाटेने 1 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात…”, नवऱ्यासोबत दोन फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर केली. प्रणितच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
'दोघांनी पार्टी केली, दारु प्यायली', 10 वर्षांनंतर घटस्फोटावर बोलली सई ताम्हणकर, पाहा VIDEO
advertisement
प्रणितने तिच्या करिअरची सुरुवात “कारभारी लयभारी” या मालिकेतून केली. या मालिकेत तिने गंगाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका खूप फेमस झाली आणि लोक तिला गंगा म्हणून ओळखू लागले. या भूमिकेनं तिला एक नवी ओळख मिळवून दिली. याशिवाय प्रणितने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. “रिअॅलिटी शो डान्सिंग क्वीन” मध्ये प्रणितने सहभाग घेतला होता. यामध्ये तिने आपल्या डान्सिंग कौशल्याने अनेकांची मने जिंकली.
दरम्यान, प्रणित हाटे लग्नबंधनात अडकली असून तिच्यावर सध्या शुभेच्छा आणि आशिर्वादाचा वर्षाव होत आहे. तिच्या नव्या आयुष्यासाठी चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.