Sai Tamhankar On Divorce: 'दोघांनी पार्टी केली, दारु प्यायली', 10 वर्षांनंतर घटस्फोटावर बोलली सई ताम्हणकर, पाहा VIDEO

Last Updated:

Sai Tamhankar On Divorce: सेलिब्रिटी जितक्या लवकर आणि थाटामाटात लग्न करतात तेवढ्यात लवकर घटस्फोटही घेतात. त्यामुळे आजकाल घटस्फोटाच्याच बातम्या अधिक समोर येत आहेत.

10 वर्षांनंतर घटस्फोटावर बोलली सई ताम्हणकर
10 वर्षांनंतर घटस्फोटावर बोलली सई ताम्हणकर
मुंबई :  सेलिब्रिटी जितक्या लवकर आणि थाटामाटात लग्न करतात तेवढ्यात लवकर घटस्फोटही घेतात. त्यामुळे आजकाल घटस्फोटाच्याच बातम्या अधिक समोर येत आहेत. घटस्फोटानंतरचे फोटोशूट आणि पार्टीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक घटस्फोट 10 वर्षापूर्वी एका अभिनेत्रीचा झाला होता. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी सई ताम्हणकर आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकरने 2013 मध्ये निर्माता अमेय गोसावीशी लग्न केलं, परंतु 2 वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्न आणि घटस्फोटाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अलीकडेच, हॉटरफ्लायशी झालेल्या मुलाखतीमध्ये, सईने तिच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल बोलले आणि अनेक धक्कादायक खुलासे केले. घटस्फोटानंतर तिची परिस्थीती काय होती आणि तिनं काय केलं याविषयी तिनं सांगितलं.
advertisement
घटस्फोटावर काय म्हणाली सई ताम्हणकर?
सईने मुलाखतीत सांगितलं की कोर्टात घटस्फोट निश्चित झाल्यानंतर तिने आणि तिचा EX नवरा अमेयने त्यांच्या 8-10 मित्रांसोबत पार्टी केली. कोर्टात घटस्फोटादरम्यानचा अनुभव सांगताना अभिनेत्री म्हणाली, 'तिथे घटस्फोटासाठी बोलावताना नाव घेताना ते मोठ्याने ओरडतात. तिथे माझं नाव'सई ताम्हणकर गोसावी' असं घेतलं. कारण घटस्फोटाच्या कागदपत्रांवर माझे नाव होते. घटस्फोटासाठी जाताना ते लग्नाचंच नाव घेतात. त्यामुळे मीपण ते बदललं नाही.
advertisement
सई पुढे म्हणाली, घटस्फोटानंतर आम्ही दोघेही एका विचित्र झोनमध्ये होतो. आम्हाला फक्त आराम करायचा होता, म्हणून आम्ही ड्रिंक्ससाठी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मग आम्ही 'तिथे रडलो आणि काही प्रेमाबद्दल बोललो आणि आयुष्याबाबत काही सल्ला दिला. काही जवळच्या मित्रांना याची माहिती होती, म्हणून त्यांनीही पार्टीसाठी आम्हाला जॉईन केलं.
advertisement
आमच्या मित्रांना घटस्फोटाचं माहित असल्यामुळे,मग एकामागून एक फोन येऊ लागले, कसे आहात, सगळे ठीक आहे ना? त्यांनी फोन करताच आम्ही त्यांना आमचे लोकेशन सांगितले आणि मग 8-10 लोक तिथे आले. मग आम्ही एकत्र दारू प्यायलो आणि मस्त वेळ घालवला. सईने सांगितले की घटस्फोटानंतरही तिचे EX पती अमेयसोबत चांगले संबंध आहेत. दोघेही एकमेकांना सतत भेटत असतात.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sai Tamhankar On Divorce: 'दोघांनी पार्टी केली, दारु प्यायली', 10 वर्षांनंतर घटस्फोटावर बोलली सई ताम्हणकर, पाहा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement