TRENDING:

'माझ्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी...!' साऊथच्या स्टार व्हिलनने गायलं आदर्श शिंदेचं मराठी गाणं, VIDEO तुफान व्हायरल

Last Updated:

South Indian Star singing Marathi Song: नुकतंच एका साऊथच्या स्टार अभिनेत्याने आदर्श शिंदेने गायलेलं लोकप्रिय गाणं गायलं आहे. त्यांना गाताना पाहून त्यांचे चाहते आणि मराठी प्रेक्षक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आपल्या देशात बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांची तुफान फॅन फॉलोविंग आहे. पण असे असतानाही अनेक इतर भाषिक कलाकारांना मराठी सिनेमे, मराठी नाटकं आणि मराठी संगीताची कमालीची आवड आहे. असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या चाहत्यांना मराठीतील कलाकृती पाहण्याचं प्रामाणिक आवाहन करताना दिसतात. नुकतंच एका साऊथच्या स्टार अभिनेत्याने आदर्श शिंदेने गायलेलं लोकप्रिय गाणं गायलं आहे. त्यांना गाताना पाहून त्यांचे चाहते आणि मराठी प्रेक्षक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पडद्यावर खलनायक म्हणून वावरणाऱ्या या अभिनेत्याला देवा तुझ्या गाभाऱ्याला हे गाणं गाताना पाहणं मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली आहे.
News18
News18
advertisement

हे दिग्गज अभिनेते आहेत मुरली शर्मा. मराठी अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांचे पती मुरली शर्मा तामिळ, तेलुगु आणि हिंदी सिनेमांमध्ये प्रामुख्याने खलनायकाचे पात्र साकारताना दिसले आहेत. मात्र त्यांनी गायलेले आदर्श शिंदेचे देवा तुझ्या गाभाऱ्याला हे गाणं गाताना पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. अश्विनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये मुरली हे सुंदर गाणं गाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी गाण्यातील भाव पूर्णपणे जपला असून त्यांच्या आवाजात ती वेदना दिसून येत आहे.

advertisement

मराठी प्रेक्षकांसाठी मुरली शर्मा यांचं गोड सरप्राइज

अश्विनी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, माझ्या सर्व मराठी प्रेक्षकांसाठी आणि सगळ्या महाराष्ट्रासाठी मी मुरलीला विनंती केली की मराठीतून काही ऐकव. तर तो म्हणाला, ठीक आहे दोन ओळी मराठीतून गातो. हे मराठी गाणं आमचं आवडतं आहे. तर पहिलं पुष्प तुमच्यासाठी. यानंतर मुरली यांनी 'दुनियादारी' चित्रपटातील गाजलेलं, प्रसिद्ध मराठी गायक आणि संगीतकार आदर्श शिंदे याच्या आवाजातील देवा तुझ्या गाभाऱ्याला हे गाणं गायलं. विशेष म्हणजे, दाक्षिणात्य प्रभाव असूनही मुरली शर्मांनी गाण्यातील शब्दांचे उच्चार आणि त्यातील आर्तता हुबेहूब जपली आहे. त्यांच्या आवाजातील वेदना पाहून अश्विनी यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

advertisement

मुरली शर्मा यांचे मराठी कनेक्शन

अनेकांना ठाऊक नसेल, पण मुरली शर्मा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील असला, तरी त्यांचे वडील ब्रिजभूषण शर्मा हे मूळचे मराठी आहेत, तर त्यांची आई तेलुगू आहे. बालपण मुंबईत गेल्यामुळे मुरली स्वतःला अभिमानाने मुंबईकर समजतात. त्यांची मातृभाषा मराठी असल्यामुळेच की काय, त्यांच्या गाण्यात तो अस्सल मराठी गोडवा उतरला आहे.

advertisement

कशी रंगली अश्विनी आणि मुरली यांची जोडी?

अश्विनी आणि मुरली यांचं व्यावसायिक आयुष्य जेवढं यशस्वी आहे, तेवढंच त्यांचं वैवाहिक आयुष्यही प्रेरणादायी आहे. प्रकाश झा यांच्या 'अपहरण' सिनेमाच्या सेटवर या दोघांची पहिली ओळख झाली. आधी मैत्री झाली आणि २००९ मध्ये त्यांनी आपल्या रूपांतर विवाहात केलं. अश्विनी सांगतात की, ते केवळ पती-पत्नी नसून एकमेकांचे उत्तम टीकाकारही आहेत. एखादा सीन शूट झाल्यावर ते एकमेकांशी चर्चा करतात आणि सुधारणा सुचवतात. 'गोलमाल' फ्रँचायझीमधील या दोघांच्याही भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वयंपाक घराचा खर्च वाढला, मसाल्यांच्या दरात मोठी वाढ, कारण काय?
सर्व पहा

मुरली शर्मा यांनी आतापर्यंत १३० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. केवळ खलनायकच नाही, 'सिंघम'मधील पोलिस अधिकारी असो किंवा साऊथच्या चित्रपटांमधील महत्त्वाच्या भूमिका, त्यांनी प्रत्येक पात्रात जिवंतपणा आणला आहे. मात्र, पत्नीच्या विनंतीवरून त्यांनी सादर केलेलं हे गाणं त्यांच्या आजवरच्या सर्व भूमिकांपेक्षा जास्त भाव खाऊन गेलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझ्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी...!' साऊथच्या स्टार व्हिलनने गायलं आदर्श शिंदेचं मराठी गाणं, VIDEO तुफान व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल