चिखलात लोळली 'माया', अश्विनीने शेअर केले BTS Photos
मालिकेतील एका सीनमध्ये, मकरंद जेव्हा जानकीला मागणी घालायला जातो, तेव्हा मायाही त्याच्यासोबत दिमतीला असते. चाळीत उभ्या असताना लहान मुलांशी तिचा पंगा होतो आणि मुलांचा पाठलाग करताना माया थेट चिखलात तोंडावर पडते. २९ डिसेंबरच्या भागात प्रेक्षकांनी हा सीन पाहिला, पण तो शूट करताना अश्विनीची जी तारांबळ उडाली, त्याचे BTS फोटो तिने आता शेअर केले आहेत.
advertisement
पूर्णपणे चिखलाने माखलेली अश्विनी या फोटोंमध्ये दिसतेय. ती सांगते, "शूटिंग करताना मी खरंच पडले आणि कितीतरी वर्षांनी माझे गुडघे फुटले. हे पाहून मला माझं लहानपण आठवलं. तेव्हाही खेळताना, भांडताना असेच गुडघे फुटायचे." अश्विनीने ही धडपड होऊनही मोठ्या खिलाडूवृत्तीने शूटिंग पूर्ण केलं, त्याबद्दल तिचं कौतुक होत आहे.
फोटोंसाठी अश्विनीचं हटके कॅप्शन
अश्विनीने आपल्या पोस्टला एक जबरदस्त फिल्मी टच दिला आहे. मकरंदची भूमिका साकारणाऱ्या कश्यप परुळेकरसोबतचा फोटो शेअर करत तिने लिहिलंय, "जानकी तुझीच होणार रे मकरंद दादा... और मेरा वचन ही है मेरा शासन! #विषय_end. राहुल लिंगायत सर आणि माझं ठरलंय, विजयाचा गुलाल आपलाच!" मायाची ही जिद्द पाहून प्रेक्षकही चक्रावून गेले आहेत.
जानकीची कमेंट अन् सोशल मीडियावर कल्ला
अश्विनीच्या या आव्हानात्मक पोस्टवर प्रत्यक्ष 'जानकी' म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने कमेंट केली आहे. रेश्माने लगेच सडेतोड उत्तर देत लिहिलं, "तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही!" रेश्माच्या या एका कमेंटने नेटकरीही पोट धरून हसले. जानकी मकरंदची होणार की हृषीकेशची? हे तर मालिकेत कळेलच, पण या दोघींच्या मैत्रीपूर्ण वॉरने चाहत्यांची चांगलीच करमणूक केली आहे.
मालिकेत काय घडतंय?
सध्या मालिकेत मकरंदचा 'मास्क मॅन' बनून जानकीला त्रास देण्याचा भूतकाळ उलगडत आहे. माया ही केवळ बहीण नसून मकरंदच्या प्रत्येक वाईट कामातली भागीदार आहे, हे ही समोर आलंय. या लग्नापूर्वीच्या विशेष भागांमुळे मालिकेची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.
