गोविंदा अहुजावर फिजियोथेरपी फिजियोथेरेपिस्ट डॉ. सुरभि धनवाला यांनी केली आहे. त्यांनी 'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "गोविंदाने स्वत:च्या पायाला चुकून बंदुकीतील गोळी मारलेली. जेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, तेव्हाच त्यांच्यावर मी तात्काळ उपचार करण्यासाठी सुरूवात केली. ते खूपच फिट आहेत. माझी त्यांच्यासोबत ॲक्सिडेंटच्या आधीही आणि ॲक्सिडेंटच्या नंतर सुद्धा भेट झाली होती. ते खूपच शिस्तप्रिय व्यक्ती आहेत. सकाळी लवकर उठणे, योगा करणे म्हणजेच एक उत्तम जीवनशैली फॉलो ते करतात. ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत."
advertisement
"अपघाताच्या वेळी त्यांच्या मांड्यांवर खूपच जखमा होत्या.", असं सुद्धा फिजियोथेरेपिस्टने सांगितलं. जेव्हा फिजियोथेरेपिस्टला अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की मी केव्हाही सुनीता आहुजा यांना प्रत्यक्षात भेटले नाही. कारण त्या केव्हाच गोविंदाच्या कोणत्याही फिजियोथेरपीच्या सेशन्समध्ये सहभाग घेत नव्हत्या. "मी सुनीता यांना केव्हाही भेटले नाही आणि त्या केव्हाही गोविंदाच्या फिजियोथेरेपीच्या सेशन्समध्ये आलेल्या नाहीत. खरंतर, अभिनेता एक खूपच खंबीर व्यक्तिमत्व आहे. मला विश्वास आहे की तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवेल."
डॉक्टरांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट सांगितले की, " गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यात जी काही समस्या आली आहे, त्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. या सर्वांचा अभिनेत्याला त्रास होत असला तरीही त्या सर्व गोष्टींचा सामना करण्या इतपत तो स्ट्राँग व्यक्ती आहे. गोविंदा तासन् तास ध्यानधारणेत मग्न असतात. ते खूपच आध्यात्मिक असून, त्यांची देवावर खूप श्रद्धा आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या समस्यांसोबत कसं लढायचं, हे अभिनेत्याला माहिती आहे." गेल्या काही दिवसांपूर्वीच गोविंदा आणि सुनिताची लेक टीना अहुजाने आई- वडिलांच्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिलेली होती. ती म्हणालेली की, "गेले दोन वर्षे अहुजा फॅमिलीसाठी चांगले राहिलेले नाही. त्या दिवसांत आम्ही सर्वांनी अनेक चढ-उतार पाहिलेय." दरम्यान, सुनिताने गोविंदावर एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता, ज्यावर त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की ते खरे नाही. "जर त्याचे स्वतःचे कुटुंब असे म्हणत असेल तर मी कोणाकडे पाहायचं? मी फक्त काम करतो आणि पुढेही करत राहील."
