TRENDING:

प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या 53 वर्षी घेतला अखेरचा श्वास, दुर्धर आजारामुळे निधन

Last Updated:

प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. एका दुर्धर आजारामुळे अभिनेत्याचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: हॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचं निधन झालं आहे. डॉक्टर मार्क मॅकस्टीमीची भूमिका साकारून जगभरामध्ये प्रसिद्ध झालेल्या कलाकाराचे निधन झाले आहे. अभिनेता एरिक डेन यांचं वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्याच्या पीआर टीमकडून निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. एरिक डेनचं निधन एका दुर्धर आजारामुळे झाल्याची माहिती मिळाली आहे. एरिकच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
greys anatomy star eric dane dies
greys anatomy star eric dane dies
advertisement

एरिक डेनच्या निधनानंतर त्याच्या पीआर टीमकडून एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. अभिनेत्याला 2025 मध्ये एमियोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिस (ALS) नावाच्या दुर्धर आजाराचे निदान झाले होते. अभिनेत्याचं निधन या दुर्धर आजारामुळे झाले आहे. डेनने अभिनेत्री रेबेका गेहार्टसोबत 2004 मध्ये लग्नगाठ बांधली. परंतु 2018 मध्ये रेबेकाने डेनसोबत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु नंतर तिने तो घटस्फोटासाठीचा अर्ज मागे घेतला. रेबेका आणि एरिक हे दोघंही गेले अनेक वर्षे वेगळेच राहत असल्याचं, रेबेका हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. परंतु असं असलं तरीही ते दोघंही एकमेकांच्या सुख: दुखा:त सामील होतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वातावरण साथ देईना,होतंय नुकसान? शेतीतले 5 यशस्वी प्रयोग, पैसा घरी येईल चालत!
सर्व पहा

डेनने आजारपणाच्या काळात फॅमिलीसोबत एकत्र वेळ घालवला होता. त्याच्या मुलीने आणि पत्नीने शिवाय इतर नातेवाईकांनीही त्याला त्याच्या वाईट काळामध्ये साथ दिली. डॅनने त्याच्या आजाराविषयी असेही म्हटले की, आजारपणात तो त्याच्या कुटुंबाचा खूप आभारी आहे, जे नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहिले. डॅन आणि गेहार्ट यांना दोन मुली आहेत. पहिल्या मुलीचं नाव बिली असून तिचा जन्म 2010 मध्ये झालेला आहे. तर दुसऱ्या मुलीचं नाव जॉर्जिया असं आहे, जिचा जन्म 2011 मध्ये झाला आहे. रेबेका म्हणाली होती की, मुलींनी पूर्ण वेळ त्यांच्या वडिलांसोबत घालवला आहे. त्याच्या आजारपणात त्यांनी त्याला आधार दिला होता.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या 53 वर्षी घेतला अखेरचा श्वास, दुर्धर आजारामुळे निधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल