TRENDING:

Nana Patekar on Ajit Pawar Death: 'मी माझा लहान भाऊ गमावला',अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाले नाना

Last Updated:

Ajit Pawar: महाराष्ट्राचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने अवघ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावलेले असतानाच, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य अजूनही धक्क्यातून सावरलेलं नाही. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीकडे झेपावणारं त्यांचं विमान धावपट्टीवरच कोसळलं आणि दादांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावलेले असतानाच, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच नानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
News18
News18
advertisement

२० वर्षांच्या 'दादा'पासून आजपर्यंतचा प्रवास!

नाना पाटेकर यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाना म्हणाले, "अजित पवार जेव्हा अवघ्या १९-२० वर्षांचे होते, तेव्हापासून आमची मैत्री आहे. एका सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी सुरू केलेला प्रवास आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत घेतलेली झेप मी जवळून पाहिली आहे. लोक त्यांना राजकारणी म्हणून ओळखत असतील, पण माझ्यासाठी ते माझे धाकटे भाऊ होते. राजकारण येतं आणि जातं, पण मी माझ्या आयुष्यातला एक चांगला मित्र आणि लहान भाऊ कायमचा गमावला आहे."

advertisement

सुनेत्रा वहिनी आणि रोहित पवारांच्या भूमिकेवर भाष्य

अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यावर बोलताना नाना म्हणाले, "सुनेत्रा वहिनींच्या दुःखाची कल्पना कोणीही करू शकत नाही. हे दुःख त्यांनाच पचवावं लागणार आहे. पदभार स्वीकारला असला तरी ती जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल, पण मला खात्री आहे की त्या हा डोलारा पेलतील." तसेच, रोहित पवारांनी या अपघाताबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांवर नानांनी संयमी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "रोहितने आपला काका गमावला आहे. त्याच्या मनात जे काही प्रश्न असतील, ते विचारण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. हा पवार कुटुंबाचा वैयक्तिक विषय आहे आणि त्यावर एक सामान्य माणूस म्हणून मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

नाना पाटेकर आणि अजित पवार यांच्यातील या जिव्हाळ्याच्या नात्यामागे एक मनोरंजक धागाही जोडला गेलेला आहे. अजित पवार हे नानांच्या स्पष्टवक्तेपणाचे फॅन होते, तर नानांना दादांची कामाची शिस्त आवडायची.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Nana Patekar on Ajit Pawar Death: 'मी माझा लहान भाऊ गमावला',अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाले नाना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल