TRENDING:

जितेंद्र कपूर यांची 855 कोटींची 'डील'! अंधेरीतील प्रॉपर्टी विकून झाले मालामाल! कशाचा सौदा केला?

Last Updated:

Jitendra Kapoor Property/Net Worth : जितेंद्र कपूर यांनी अंधेरीतील 855 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकली आहे. यातून कपूर कुटुंबाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर, ज्यांना प्रेमाने 'जंपिंग जॅक' म्हणून ओळखले जाते, ते सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असले तरी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते एका मोठ्या व्यावसायिक करारामुळे चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र यांनी नुकतीच अंधेरीतील त्यांची एक मोठी प्रॉपर्टी विकली आहे. मे २०२५ मध्ये हा जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला असून, यातून जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे!
जितेंद्र कपूर यांनी अंधेरीतील 855 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकली आहे.
जितेंद्र कपूर यांनी अंधेरीतील 855 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकली आहे.
advertisement

855 कोटींची मेगा डील!

'सीएनबीसी टीव्ही१८' (CNBC TV18) च्या एका रिपोर्टनुसार, जितेंद्र कपूर यांनी अंधेरीतील त्यांची ही प्रॉपर्टी तब्बल 855 कोटी रुपयांना विकली आहे. ही जमीन जितेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता तुषार कपूर तसेच कपूर कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर होती, जी आता विकली गेली आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी 8.69 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.

advertisement

राखीच्या हिरोसोबत दीपिका पादुकोणचं अफेअर, 2 वर्षांतच Love Story चा 'दी एंड'! कोण होता 'तो'?

जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने ही प्रॉपर्टी एनटीटी (NTT) ग्लोबल डेटा सेंटर्स अँड क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला विकली आहे. या कंपनीने 855 कोटी रुपये देऊन ही जमीन आपल्या नावावर केली आहे. ही कंपनी यापूर्वी 'नेटमॅजिक आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड' या नावाने ओळखली जात होती. ही प्रॉपर्टी सध्या 'बालाजी आयटी पार्क'मध्ये असून, त्यात तीन इमारती समाविष्ट आहेत. जमिनीचे एकूण क्षेत्रफळ 45,572.14 स्क्वेअर मीटर इतके प्रचंड आहे.

advertisement

जितेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना फक्त 100 रुपये मानधन मिळाले होते आणि दुर्दैवाने तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नव्हता. मात्र, 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फर्ज' या चित्रपटातून त्यांना खरे यश मिळाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ते एक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते ठरले.

advertisement

जितेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्यात 'हिम्मतवाला', 'थानेदार', 'खुदगर्ज', 'तोहफा', 'मवाली', 'फर्ज और कानून', 'आशा', 'जीने की राह', 'धरमवीर' आणि 'कारवाँ' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटसृष्टीतून दूर असले तरी, जितेंद्र कपूर आजही आपल्या व्यावसायिक दूरदृष्टीमुळे आणि कौटुंबिक यशामुळे चर्चेत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
जितेंद्र कपूर यांची 855 कोटींची 'डील'! अंधेरीतील प्रॉपर्टी विकून झाले मालामाल! कशाचा सौदा केला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल