राखीच्या हिरोसोबत दीपिका पादुकोणचं अफेअर, 2 वर्षांतच Love Story चा 'दी एंड'! कोण होता 'तो'?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Love Affairs : एका अभिनेत्याने थेट दावा केला आहे की, बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री एकेकाळी त्याच्या प्रेमात होती आणि तिनेच त्याला प्रपोज केलं होतं!
मुंबई: बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा नेहमीच रंगतात. काही जण आपलं नातं जगापासून लपवतात, तर काही अगदी खुलेपणाने ते स्वीकारतात. पण, काही नात्यांमध्ये थेट कबुली नसतानाही त्याबद्दलच्या चर्चा मात्र कायम राहतात. सध्या अशाच एका जुन्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, कारण एका अभिनेत्याने थेट दावा केला आहे की, बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री एकेकाळी त्याच्या प्रेमात होती आणि तिनेच त्याला प्रपोज केलं होतं!
advertisement
अभिनेता मुजम्मिल इब्राहिम सध्या याच दाव्यामुळे चर्चेत आला आहे. 'सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्ट'वर (Siddharth Kannan's Podcast) बोलताना मुजम्मिलने सांगितलं की, दीपिका पादुकोण त्याच्या प्रेमात वेडी होती. मुंबईत दीपिकाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी दोन वर्षं एकमेकांना डेट केलं होतं. हे त्यांचं पहिलं 'खरं' नातं होतं, असाही दावा त्याने केला. विशेष म्हणजे, दीपिकानेच त्याला प्रपोज केलं होतं, असं मुजम्मिल सांगतो.
advertisement
मुजम्मिल म्हणाला, "आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि आजही आहोत. ती खूप चांगली मुलगी आहे. आम्ही मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये एकमेकांना डेट केलं. आम्ही टॉमी हिलफिगरसाठी एकत्र शो केले. तिने मला 'ग्लॅडरॅग्स', 'परदेसिया' आणि अशाच इतर कामांमध्ये पाहिलं होतं आणि तिला मी खूप आवडायचो. अशा प्रकारे आमची भेट झाली."
advertisement
मुजम्मिलने पुढे धक्कादायक दावा केला, "आम्ही दोन वर्षं एकमेकांना डेट केलं. मी बॉम्बेमध्ये तिला भेटणारा पहिला व्यक्ती होतो. हे माझं पहिलं वास्तविक नातं होतं. दीपिकानेच मला आधी प्रपोज केलं. आम्ही वेगळे झालो, कारण मी तिला सोडून दिलं होतं, पण मला त्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. मला कधीही कोणाला सोडल्याचा पश्चात्ताप होत नाही. तसेच, मी त्या वेळी एक स्टार होतो, ती नव्हती. ती एक मॉडेल होती, पण मी तोपर्यंत अभिनेता बनलो होतो."
advertisement
मुजम्मिलने सांगितलं की, दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर त्यांचा संपर्क तुटला. तो म्हणाला, "तिच्या लग्नापूर्वी आम्ही कधीकधी बोलायचो आणि ती नेहमीच खूप प्रेमळ होती. ब्रेकअपनंतर लगेच आम्ही मित्र बनलो नाही, पण शेवटी आम्ही पुन्हा संपर्कात आलो. आम्ही एकमेकांच्या यशोगाथांवर एकमेकांचं अभिनंदन करायचो आणि नेहमी एकमेकांचं कौतुक करायचो."
advertisement
'धोका' चित्रपटातील या अभिनेत्याने मुंबईच्या पावसाळ्यात दीपिकासोबत डेटवर गेल्याच्या आठवणीही सांगितल्या. तो म्हणाला, "आम्ही दोघं त्या वेळी खूप लहान होतो आणि जेव्हा आम्ही शहरात पावसादरम्यान ऑटो रिक्षातून फिरायचो, तेव्हा ते खूप छान वाटायचं. मला आठवतंय, एकदा मी ड्रायव्हरला त्याचं आवडतं गाणं वाजवायला सांगितलं होतं आणि दीड तास त्याने फक्त तेच गाणं वाजवलं. ती खूप खूश होती." मुजम्मिलने दीपिकासोबतच्या ब्रेकअपचं नेमकं कारण सांगितलं नसलं तरी, त्यांच्यात कोणताही 'अहंकार' किंवा 'द्वेष' नव्हता, असं तो म्हणाला.
advertisement
advertisement
आज दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील नंबर वन अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने २०१८ मध्ये रणवीर सिंहसोबत लग्न केलं आणि २०२४ मध्ये त्यांनी 'दुआ' नावाच्या मुलीचं स्वागत करत पालकत्वाचा आनंद घेतला. ती सध्या आपल्या कामात आणि खासगी आयुष्यात समतोल साधत आहे. या सगळ्या दरम्यान मुजम्मिल इब्राहिमने केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा दीपिकाच्या जुन्या आयुष्यातील पानांना उजाळा मिळाला आहे.