Video : चालत्या मेट्रोत प्रवासी हे काय करू लागला? कुणी टकामका पाहतच राहिलं, तर कुणी लाजेने तोंड लपवलं

Last Updated:

Metro Video Viral : गर्दीने भरलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये अनेकदा लोक त्यांच्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येतं. पण  मेट्रोमध्ये प्रवास करताना एका व्यक्तीने उघडपणे असं काही केलं की व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

News18
News18
नवी दिल्ली : मेट्रो ज्याने कितीतरी लोक दररोज प्रवास करतात. ऑफिसला जाणारे असोत, कॉलेजचे विद्यार्थी असोत किंवा बाहेर फिरणारे असोत, मेट्रो कित्येकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. पण मेट्रोचा प्रवास जितका आरामदायी तितकाच अनेकदा तो विचित्र घटनांचा साक्षीदारही बनला आहे. कधीकधी प्रवासी अशा गोष्टी करतात ज्यामुळे इतरांना धक्का बसतो. सोशल मीडियाच्या जगात लोक फक्त लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी जाणूनबुजून अशा कृती करतात ज्या इतरांना अस्वस्थ करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
गर्दीने भरलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये अनेकदा लोक त्यांच्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येतं. पण  मेट्रोमध्ये प्रवास करताना एका व्यक्तीने उघडपणे असं काही केलं की व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे दृश्य पाहून प्रवासी थक्क झाले.
या व्हिडिओमध्ये एक माणूस आपला मेकअप किट बाहेर काढतो. सगळ्यात आधी तो डोळ्यांखालील पॅचेस काढते. नंतर प्राइमर, फेस क्रीम लावतो. नंतर आयलायनर, काजल, फाउंडेशन, लिपस्टिक, लिपग्लॉस, टिंट एक-एक करून लावतो. तो प्रत्येक स्टेप्स इतक्या सहजतेने करतो की जणू मेट्रोचा डबाच त्याचा ड्रेसिंग रूम बनला आहे. मेट्रोमध्ये उभा राहून एका हाताने मेकअप आणि दुसऱ्या हाताने मोबाईल फोनवर स्वतःचं रेकॉर्डिंग.  त्याने कोचमध्ये उभा राहून संपूर्ण मेकअप रूटीन रेकॉर्ड केलं. असं दिसतं की तो मेकअप ट्युटोरियल व्हिडिओ शूट करत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि त्याच्या हातांची कौशल्ये स्पष्टपणे दर्शवतात की तो या दैनंदिन कामात पारंगत आहे.
advertisement
दरम्यान मेट्रोमध्ये त्याच्याभोवती उभे असलेले आणि बसलेले प्रवासी प्रवासी सुरुवातीला आश्चर्यचकित झाले, त्याला विचित्र पद्धतीने पाहत आहेत. या संपूर्ण दृश्यात त्याच्या आजूबाजूचे लोक सतत त्याच्याकडे पाहत आहेत. काही जण हसत आहेत, काही जण डोळ्यांचा संपर्क टाळत आहेत, तर काही जण डोके खाली करून आणि त्यांच्या मोबाईल फोनवर लक्ष केंद्रीत करून परिस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा संकोच आणि अस्वस्थता कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येते.
advertisement
advertisement
चालत्या मेट्रोमध्ये मेकअप करणाऱ्या या पुरूषाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्याच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी टीका केली आहे.   एका युझरने म्हटलं आहे, "मलाही असाच आत्मविश्वास हवा आहे." दुसऱ्याने म्हटले, "जे लोक पाहत आहेत त्यांच्यावर झूम इन करणं खूप छान आहे." दुसऱ्याने म्हटले, "चालत्या मेट्रोमध्ये तुम्ही जितका चांगला मेकअप करता तितका चांगला मी मी माझ्या खोलीतही करू शकत नाही. मला स्वतःची लाज वाटते" काहींनी हे मेट्रो शिष्टाचाराचे उल्लंघन मानलं आहे. काहींनी याला सार्वजनिक वाहतुकीचा गैरवापर म्हटले. वादविवाद काहीही असो, व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
advertisement
@a_g_o_u या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील असल्याचं सांगितलं जातं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/Viral/
Video : चालत्या मेट्रोत प्रवासी हे काय करू लागला? कुणी टकामका पाहतच राहिलं, तर कुणी लाजेने तोंड लपवलं
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement