बंदुकीच्या धाकावर लुटलं, तरी लोक करत आहेत या चोरांचं कौतुक, का? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Thief Video Viral : चोरी करणं म्हणजे काही चांगलं काम नाही. त्यामुळे चोराचं कौतुक... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही या चोराचं कौतुक करा.
देश किंवा जगात कुठेही जा, तुम्हाला चोर सापडतीलच. चोर अनेकदा निर्जन रस्त्यांवर लोकांना एकटे शोधतात, त्यांना धमकावतात आणि पैसे किंवा मौल्यवान वस्तू चोरतात. अलिकडेच, दोन चोरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका माणसाला लुटत आहेत. बंदूक दाखवून त्याचे पैसे हिसकावून घेत आहेत. पण तरी लोक या चोरांचं कौतुक करत आहेत.
चोरी करणं हे काही चांगलं काम नाही. चोरी आपल्या घरात असो वा दुसऱ्या कुणाच्या घरात ती वाईटच. चोराला शिक्षा ही मिळायलाच हवी. पण दोन चोरटे ज्यांचा चोरीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यांचं कौतुक करत आहेत. चोराचं कौतुक... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही या चोराचं कौतुक करा.
advertisement
@dekh.beta या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन चोर एका दुचाकीस्वाराला लुटताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक माणूस दुचाकीवर बसलेला दिसतो, जिथे दोन चोर त्यांच्या दुचाकीवरून येतात. त्यापैकी एक बंदूक दाखवतो आणि त्या माणसाचं पाकीट आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतो. नंतर दोघंही आपल्या गाडीवर बसायला जातात. इतक्यात ज्या माणसाला लुटण्यात आलं तो रडू लागतो. त्याला रडताना पाहून एक चोर गाडीवरून पुन्हा उतरतो आणि त्याच्या जवळ जातो. त्याला आपल्या छातीशी घेतो, मिठी मारतो, त्याचं सांत्वन करतो.
advertisement
नंतर तो दुसऱ्या चोरालाही गाडीवरून खाली उतरायला सांगतो आणि त्याचे लुटलेले पैसे, मोबाईल त्याला परत करतो. इतकंच नव्हे तर तो चोर आपल्या खिशातील पैसेही त्या व्यक्तीला देतो.
advertisement
हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे News18 मराठी त्याची सत्यता पडताळू शकत नाही. हा व्हिडिओ केवळ व्हायरल होण्यासाठी तयार केला गेला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर खात्रीने दावा करता येत नाही.
चोराची अशी बाजू पाहून या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटले आहे, देव त्याच्या बिझनेसला, दुसऱ्याने म्हटलं आहे, तो मनाने चांगला चोर आहे, तो खूप पुढे जाईल.तिसऱ्याने म्हटलं आहे की हा व्हिडिओ पाहून आपल्याला शिकवलं जातं की माणसाचं मन चांगले असलं पाहिजे.
Location :
Delhi
First Published :
September 21, 2025 7:01 AM IST