VIDEO : वडिलांनी फक्त मुलाला दिला iPhone, मुलगी बिच्चारी पाहतच राहिली, शेवट हृदयस्पर्शी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Father and children video : मुलगा आणि मुलगी असा भेदही आजही बहुतेक ठिकाणी पाहायला मिळतो. कितीही म्हटलं तरी मुलांना सगळ्या गोष्टी दिल्या जातात. मुलगी म्हणून तिला नाही. या व्हिडीओतही आपल्याला तेच दिसून येतं. पण...
नवी दिल्ली : बऱ्याच कुटुंबात तुम्ही असं पाहिलं असेल की एखाद्या मुलावर पालक भरभरून प्रेम करतात. पण मुलांच्या तक्रारी असतात की तुम्ही त्याच्यावरच जास्त प्रेम करता, माझ्यावर नाही. त्याला सगळं देता, मला काही नाही. असाच काहीसा वाटणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पण या व्हिडीओचा शेवट पाहून डोळ्यात पाणी येईल आणि चेहऱ्यावर हसूही उमटेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक मुलगा आणि मुलगी जे भाऊबहीण आहेत. दोघंही एकमेकांसोबत बसले आहेत. त्यांच्या मागे एक व्यक्ती आहे, जी या मुलांचे वडिल आहेत. वडिलांनी मुलाला आयफोन गिफ्ट केला आहे. मुलगा ते आनंदाने तो बॉक्स उघडतो. मुलगीही उत्सुकतेने आपल्या वडिलांनी आपल्या भावाला दिलेला आयफोन पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पण तरी कुठेतरी वडिलांनी आपल्याला काहीच न दिल्याची निराशाही या हसूत दिसते.
advertisement
मुलगा आणि मुलगी असा भेदही आजही बहुतेक ठिकाणी पाहायला मिळतो. कितीही म्हटलं तरी मुलांना सगळ्या गोष्टी दिल्या जातात. मुलगी म्हणून तिला नाही. या व्हिडीओतही आपल्याला तेच दिसून येतं. त्यामुळे सुरुवातीला व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला खूप राग येतो. पण शेवटी मात्र एक अनपेक्षित ट्विस्ट आहे. जो पाहून ज्या वडिलांचा तुम्ही सुरुवातीला रागराग कराल, त्यांचंच कौतुक कराल आणि त्यांना सॅल्युटही कराल.
advertisement
advertisement
पुढे तुम्ही पाहाल तर ज्यावेळी मुलगी आपल्या वडिलांनी भावाला दिलेला आयफोन पाहण्यात मग्न असते तेव्हा मुलीचं लक्ष नसताना मुलीचे वडील तिच्याही पुढ्यातही आयफोन ठेवतात. काही वेळाने मुलीचं लक्ष तिथं जातं आणि तिच्या आनंदाला पारावर उरत नाही. वडिलांकडे ती पाहते, वडीलही तिच्याकडे पाहून हसतात. तिच्या डोळ्यात पाणीही दाटून येतं.
advertisement
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण सोशल मीडियावर तुपान व्हायरल होतो आहे. @qubixnews इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो पोस्ट करण्यात आला आहे.
Location :
Delhi
First Published :
September 20, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : वडिलांनी फक्त मुलाला दिला iPhone, मुलगी बिच्चारी पाहतच राहिली, शेवट हृदयस्पर्शी