घटस्फोटित महिलेशी लग्न, काही दिवसांत गायब झाली बायको, सत्य समजताच नवरा धक्क्यात

Last Updated:

Marriage scam : फक्त 4 दिवसांच्या डेटिंगनंतर त्याने तिच्याशी लग्न केलं आणि एकत्र नवीन जीवन सुरू करण्यास उत्सुक होते. पण...

News18
News18
बीजिंग : प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अशा जोडीदाराच्या शोधात असतो ज्याच्यासोबत तो नवीन जीवन सुरू करू शकेल. पण चीनमधील जियांगशी प्रांतातील 30 वर्षीय हुआंगसाठी ही आशा दुःस्वप्नात बदलली. त्याला वाटलं होतं की लग्नामुळे त्याच्या आयुष्यात आनंद येईल, पण तो त्याच्यासाठी एक महागडा आणि वेदनादायक धडा ठरला.
इंटरनेट आणि आधुनिक माध्यमांद्वारे नातेसंबंध निर्माण करणं किती धोकादायक असू शकतं हे सिद्ध करणारी एक घटना. ही घटना डिसेंबर 2024 मध्ये घडली, जेव्हा हुआंगने एका मॅचमेकिंग एजन्सीची जाहिरात पाहिली आणि प्रेमाच्या शोधात चीनमधील गुइयांग येथील एका कंपनीशी संपर्क साधला. वृत्तानुसार झेंक्सी मॅचमेकिंग कंपनीतील एका मॅचमेकरने हुआंगची ली नावाच्या मुलीशी ओळख करून दिली. आधीच विवाहित असलेली ली तिच्या पतीला घटस्फोट देणार होती आणि दुसऱ्या लग्नासाठी वर शोधत होती.
advertisement
हुआंग आणि ली 14 डिसेंबर रोजी भेटले. 17 डिसेंबर रोजी लीचा घटस्फोट झाला. फक्त चार दिवसांच्या डेटिंगनंतर हुआंगने 18 डिसेंबर रोजी तिच्या मूळ गावी अंशुन इथं लीशी लग्न केलं. हुआंग आपल्या नवीन वधूला जियांग्शी घेऊन आला आणि एकत्र नवीन जीवन सुरू करण्यास उत्सुक होते. पण रुग्णालयात गर्भधारणेपूर्वी तपासणी दरम्यान लीला लैंगिक संक्रमित आजार असल्याचं समजलं, ती ड्रग्जही घेत होती.
advertisement
या खुलाशानंतर ली वारंवार तिच्या गावी जाऊ लागली. लग्नाला एक महिनाही झाला नव्हता की ली जानेवारी 2025 मध्ये पूर्णपणे गायब झाली, तिने हुआंगशी सर्व संपर्क तोडले.
हुआंगला आता संशय आला की तो मॅरेज स्कॅमचा बळी पडला आहे, जी लग्नाच्या बहाण्याने लोकांना पैसे देऊन फसवण्याची योजना होती. जेव्हा हुआंग मॅचमेकिंग एजन्सीकडे परतला तेव्हा त्याला आढळलं की ली इतर पुरुषांनाही भेटत आहे आणि त्यांच्याकडून पैसे आणि गिफ्ट घेत आहे. अखेर पोलिसांनी फसवणुकीच्या संशयावरून लीला ताब्यात घेतलं.
advertisement
झेंक्सी मॅचमेकिंग कंपनीचे प्रमुख यिंग गुओहोंग यांनी सांगितलं की, ज्या पुरुषांनी सुरुवातीला हुआंगची एजन्सीशी ओळख करून दिली ते अधिकृत कर्मचारी नव्हते तर बाह्य भागीदार होते. कंपनीने हुआंगची एजन्सी फी सुमारे परत केली आहे, परंतु हुआंगने गमावल्याचा दावा केलेली अतिरिक्त रक्कम भरणार नाही. हुआंग आणि कंपनी दोघांनीही पोलीस तक्रार दाखल केली आहे. ली आणि संबंधित मॅचमेकर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
घटस्फोटित महिलेशी लग्न, काही दिवसांत गायब झाली बायको, सत्य समजताच नवरा धक्क्यात
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement