Shocking! अंगावर पडली बायको आणि नवऱ्याचा मृत्यू, कारणही धक्कादायक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wife fell on husband : मंजुळाचं वजन सुमारे 128 किलो. तिचा पाय घसरला तेव्हा ती थेट पती नटवरलावर पडली. नटवरलालला सावरण्याची संधीही मिळाली नाही.
अहमदाबाद : लठ्ठ नवरा आणि सडपातळ नवरा, अशा कॅरेक्टरच्या काही फिल्म्स तुम्ही पाहिल्या असतील. त्यातील नवऱ्याची अवस्थाही पाहिली असेल. असंच काहीसं प्रत्यक्षात घडलं आहे. एक अगडबम बायको, जिचं वजन थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 128 किलो. ती आपल्या नवऱ्यावर कोसळली. ही घटना चर्चेत आली आहे.
अहमदाबादच्या राजकोट येथील राम धाम सोसायटीतील ही घटना आहे. जी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. 68 वर्षीय नटवरलाल आणि त्यांची पत्नी मंजुळा यांच्या मुलाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांच्या मुलाची तब्येत बिघडलेली पाहून मंजुळा खूप काळजीत पडली. ती वेगाने पायऱ्या चढत होती, पण यादरम्यान तिचा पाय घसरला आणि तिचा तोल गेला.
advertisement
मंजुळाचं वजन सुमारे 128 किलो. तिचा पाय घसरला तेव्हा ती थेट पती नटवरलावर पडली. नटवरलालला सावरण्याची संधीही मिळाली नाही. जास्त वजनामुळे त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेलं कुटुंब लगेच घाबरलं आणि दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.
advertisement
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याची तपासणी केली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी नटवरलालला मृत घोषित केलं. मंजुळा देखील जखमी झाली आणि तिच्यावर उपचार सुरू झाले. स्थानिकांच्या मते, हा संपूर्ण अपघात अचानक घडला आणि त्याचं मुख्य कारण मंजुळाचं वजन जास्त असणं आणि पायऱ्यांवरून तिचा पाय घसरणं हे होतं.
advertisement
भारतात 26-27 कोटी लोकं लठ्ठ आहेत. भारतातील लठ्ठपणा वेगळ्या प्रकारचा आहे. इथल्या बहुतेक लोकांच्या पोटावर चरबी असते, ज्यामुळे फारसा त्रास होणार नाही, असं लोकांना वाटतं. लठ्ठपणा बाहेरून दिसतो आणि सुरुवातीला फारसा त्रास देत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं की, यामुळे कोणताही आजार होत नाही. पण तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सावध असाल आणि भविष्यातील समस्या टाळायच्या असतील, तर लठ्ठपणा अनेक आजारांचं मूळ कारण आहे, हे लक्षात ठेवा.
advertisement
लठ्ठपणामुळे होणारे आजार
डॉ. तुषार तयाल सांगतात की, लठ्ठपणामुळे एक नव्हे, तर अनेक आजार होतात. लठ्ठपणावर नियंत्रण न ठेवल्यास, त्याचा पहिला परिणाम यकृतावर होतो. यकृतामध्ये फॅटी लिव्हरचा आजार होतो. त्यानंतर लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा प्रवाह कमी होतो, ज्यामुळे हृदयविकार होतो. हृदयविकारामुळे अचानक हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो आणि मृत्यूही होऊ शकतो. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, स्ट्रोक, मधुमेह, श्वसनाचे आजार, सांधेदुखी, यकृत आणि किडनीचे आजार इत्यादी होऊ शकतात.
advertisement
डॉ. तुषार तयाल सांगतात की, अनेक प्रकरणांमध्ये लठ्ठपणामुळे मानसिक आजारही होऊ शकतात. उदाहरणार्थ, मनात नेहमी ताण किंवा चिंता वाढू शकते. याशिवाय, तुम्हाला समाजात 'बॉडी शेमिंग' सारख्या परिस्थितीलाही सामोरं जावं लागू शकतं. अनेक प्रकरणांमध्ये लठ्ठपणामुळे निद्रानाशही होऊ शकतो.
advertisement
डॉ. तुषार तयाल म्हणाले की, कधीकधी लठ्ठपणामुळे मृत्यूही होऊ शकतो, कारण यामुळे अनेक प्रकारचे धोकादायक आजार होतात, ज्यात हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, कर्करोग, किडनी आणि यकृत निकामी होणं यांसारख्या आजारांचा समावेश असू शकतो.
लठ्ठपणाबाबत सावध राहणं महत्त्वाचं
ते म्हणाले की, जर एखाद्याचा बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल, तर त्याने लठ्ठपणाबाबत सावध राहिलं पाहिजे. पुरुषांची कंबर 40 इंचांपेक्षा जास्त आणि महिलांची कंबर 35 इंचांपेक्षा जास्त असेल, तर त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, श्वास घेण्यास त्रास होत असेल, सांधेदुखी असेल आणि झोपेत त्रास होत असेल, तर अशा परिस्थितीत त्वरित सतर्क राहिलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने वेळेत आपलं वजन नियंत्रित करणं आवश्यक आहे, अन्यथा अनेक प्रकारचे आजार त्याच्या शरीरावर हल्ला करू शकतात.
लठ्ठपणावर डाॅक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
लठ्ठपणा टाळण्यासाठी अनेक प्रकारचे सल्ले देण्यासोबतच डॉक्टर सांगतात की, तुमचा आहार संतुलित ठेवा, ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन संतुलित ठेवू शकता. डॉ. तयाल सांगतात की, संतुलित आहारात ताजी फळं, भाज्या, योग्य प्रमाणात प्रथिनं यांचा समावेश असावा. याशिवाय, तुम्ही नियमित व्यायामही करू शकता. तुम्ही दिवसातून 30-45 मिनिटं व्यायाम करू शकता. ते म्हणतात की, लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेचा तुमच्या वजनावर थेट परिणाम होतो. याशिवाय, प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड, तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ, पॅकेज केलेले पदार्थ, अल्कोहोल, जास्त साखर खाणं टाळा.
Location :
Gujarat
First Published :
September 17, 2025 8:56 AM IST