अडीच वर्षे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होतं कपल, प्रत्येक वेळी अपयश, कारण असं डॉक्टरही शॉक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pregnancy News : बऱ्याचदा जोडपी वर्षानुवर्षे मूल होण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांची गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह येत नाही. यामागे काही वैद्यकीय कारणं आहे. पण प्रत्येक वेळी कारण केवळ वैद्यकीय समस्या असेलच असं नाही. अशीही कारणं असतात ज्याचा आपण कधी विचार केला नसेल. किंबहुना डॉक्टरांनाही आश्चर्यचकित करतात.
नवी दिल्ली : लग्न झालं की काही वर्षांनी आपण आईबाबा व्हावं, आपल्याला मूल व्हावं असं स्वप्न कित्येक कपलला वाटतं. असंच आईबाब होण्याचं स्वप्न पाहणारं कपल. अडीच वर्षे मूल होण्यासाठी प्रयत्न करत होते. पण महिला प्रेग्नंटच होत नव्हती. प्रत्येक वेळी त्यांच्या पदरात अपयशच पडत होतं. शेवटी हे कपल डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टरांना जे कारण समजलं त्यामुळे तेही शॉक झाले.
बऱ्याचदा जोडपी वर्षानुवर्षे मूल होण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांची गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह येत नाही. यामागे काही वैद्यकीय कारणं आहे. पण प्रत्येक वेळी कारण केवळ वैद्यकीय समस्या असेलच असं नाही. अशीही कारणं असतात ज्याचा आपण कधी विचार केला नसेल. किंबहुना डॉक्टरांनाही आश्चर्यचकित करतात. असंच हे प्रकरण.
advertisement
स्त्रीरोग आणि प्रजनन तज्ज्ञ डॉ. आशिता जैन यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि एका केसबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, एक 32 वर्षीय जोडपं त्यांच्याकडे आलं, जे गेल्या अडीच वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होतं. पण प्रत्येक वेळी निकाल नकारात्मक येत असे. तरी आशिता जैन यांनी या कपलकडे ना कोणता रिपोर्ट मागितला, ना त्यांना कोणती टेस्ट करायला सांगितली. बोलण्याबोलण्यातच त्यांना खरं कारण समजलं जे धक्कादायक आहे.
advertisement
खरं तर आतापर्यंत या कपलमध्ये शारीरिक संबंध आले तेव्हा पतीचं वीर्यस्खलन कधी झालंच नाही. दुसरं म्हणजे पत्नी देखील आरामदायक नव्हती कारण तिला जवळीकतेबद्दल भीती आणि अस्वस्थता वाटत होती. तिने तिच्या मित्रांकडून आणि आजूबाजूच्या लोकांकडून शारीरिक संबंधाच्या स्टोरी ऐकल्या होत्या. ज्या बहुतेक वेदना आणि भीतीशी संबंधित होत्या. त्यामुळे ती घाबरली होती. परिणामी तिचं वैवाहिक जीवन थांबले आणि यामुळेच गर्भधारणा शक्य झाली नाही.
advertisement
डॉक्टर शेवटी म्हणतात की जोडप्यांनी अशा मुद्द्यांवर कोणतीही लाज न बाळगता मोकळेपणाने बोललं पाहिजे. सर्वप्रथम समस्या कुठे आहे आणि गर्भधारणेचे नियोजन का केलं जात नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ती वेदनांची भीती आहे, कृती करण्याबाबत चिंता आहे की चुकीच्या माहितीमुळे नकारात्मक परिणाम होत आहे.
Location :
Delhi
First Published :
September 11, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/Viral/
अडीच वर्षे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होतं कपल, प्रत्येक वेळी अपयश, कारण असं डॉक्टरही शॉक