Health Risk Of The Day : चहासोबत बिस्कीट खाल्ल्याने काय होतं?

Last Updated:

Health Risk Of The Day : चहा-बिस्कीट अनेकांना चांगलं वाटतं. पण याचे शरीरावर काय परिणाम होतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
मुंबई : चहा आणि बिस्कीट हे समीकरणच. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात चहा-बिस्किटाने होते. संध्याकाळही चहा-बिस्कीटवर जाते. अगदी लहानपणापासून मुलांना चहा-बिस्कीट दिलं जातं. पण डॉक्टरांच्या मते चहा-बिस्कीट हे कॉम्बिनेशन बिलकुल चांगलं नाही. चहासोबत बिस्कीट खाण्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
चहा-बिस्कीट अनेकांना चांगलं वाटतं. पण याचे शरीरावर काय परिणाम होतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अनेक डॉक्टरांनी चहासोबत बिस्कीट न खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यापैकीच एक डॉक्टर सुनील द्विवेदी. ज्यांनी चहा आणि बिस्कीट एकत्र खाण्याचे दुष्परिणाम सांगितले आहेत. त्यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
डॉ. सुनील द्विवेदी यांनी सांगितलं, ट्रान्सफॅट, सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं. बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, गूड कोलेस्ट्रॉल कमी होतं. जे हृदयाच्या आजाराचं मुख्य कारण आहे. सॉल्ट म्हणजे सोडियम जास्त होतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर होण्याची शक्यता असते, स्ट्रोक आणि हार्ट डिसीजला कारणीभूत ठरतं. शुगर जास्त असते, डायबेटिज होऊ शकतो.
advertisement
दरम्यान बिस्कीट खाण्याचेही धोके आहेत. बालरोगतज्ञ डॉ. राहुल अग्रवाल याचे उत्तर देत आहेत. डॉक्टरांनी बिस्किटे खाल्ल्याने मुलाच्या शरीरावर काय परिणाम होतो हे सांगितले.
डॉक्टर राहुल अग्रवाल म्हणतात की, बिस्किटांमध्ये कॅलरीज जास्त असतात पण पोषक तत्वे नसतात. त्यात रिफाइंड पीठ, साखर, पाम तेल आणि सोडा असतो. यामुळे मुलाच्या शरीराला दीर्घकालीन नुकसान (साइड इफेक्ट) होऊ शकते आणि त्याचे लिपिड प्रोफाइल खराब होऊ शकते. ते मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
advertisement
साखर आणि मैद्याचं जास्त प्रमाण
बहुतेक बिस्किटांमध्ये साखर आणि मैदा जास्त प्रमाणात असतो. हे दोन्ही घटक मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. जास्त साखरेमुळे दात किडणे, लठ्ठपणा आणि भविष्यात मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
मैद्यामध्ये फायबर कमी असते, ज्यामुळे पचन समस्या आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.
पोषक तत्वांची कमतरता:
बिस्किटांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते.
advertisement
मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक त्यांना मिळत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होऊ शकतो.
लठ्ठपणाचा धोका:
बिस्किटांमध्ये कॅलरीज जास्त असतात पण पौष्टिक मूल्य कमी असते. यामुळे मुलांचे वजन वाढू शकते, ज्यामुळे भविष्यात अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
भूक कमी होणे:
बिस्किटं खाल्ल्याने मुलांना पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे ते मुख्य जेवणात किंवा पौष्टिक पदार्थ खाण्यास टाळाटाळ करतात. यामुळे त्यांना आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत.
advertisement
ऍलर्जी आणि ऍडिटिव्ह्ज:
काही बिस्किटांमध्ये कृत्रिम रंग, फ्लेवर्स आणि प्रिझर्वेटिव्ह्ज असतात, ज्यामुळे काही मुलांना ऍलर्जी किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : चहासोबत बिस्कीट खाल्ल्याने काय होतं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement