Relationship : लग्न झाल्यानंतर बेबी प्लॅनिंग कधी करायचं? योग्य वेळ कोणती?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Baby planning : लग्नानंतर बेबी प्लॅनिंग कधी करायचं, तुमचं शरीर प्रेग्नन्सीसाठी किती तयार आहे, कुटुंब नियोजनासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे, हे तुम्हाला फक्त ही एक टेस्ट सांगेल.
नवी दिल्ली : लग्न झालं की काही दिवसांनी काय आता गूड न्यूज कधी, अशी विचारणा सुरू होते. कुटुंब, नातेवाईक आणि शेजारी 'तुम्ही आनंदाची बातमी कधी सांगणार आहात?' अशी विचारणा करत राहतात. पण बेबी प्लॅनिंग म्हटलं की कित्येक कपलना टेन्शन येतं, विशेषत: महिलांना. आपण बाळासाठी तयार आहोत की नाहीत, असा प्रश्न कित्येक कपल्सना पडतो. लग्न झाल्यानंतर बेबी प्लॅनिंग कधी करायचं, याची चिंता आता सोडा. कारण फक्त एक टेस्ट तुमचं हे टेन्शन संपवेल.
लग्नानंतर बेबी प्लॅनिंग कधी करायचं, तुमचं शरीर प्रेग्नन्सीसाठी किती तयार आहे, कुटुंब नियोजनासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे, हे तुम्हाला फक्त ही एक टेस्ट सांगेल. त्यामुळे लग्नानंतर ही एक साधी चाचणी करणं हे एक शहाणपणाचं पाऊल असू शकतं. आता ही चाचणी कोणती, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
ही चाचणी आहे AMH म्हणजे 'अँटी-मुलेरियन हार्मोन'. हा एक हार्मोन आहे जो महिलांच्या अंडाशयात असलेल्या लहान फॉलिकल्सपासून तयार होतो, ज्यामध्ये अद्याप पूर्णपणे विकसित न झालेल्या अंडी असतात. डॉक्टर तुमच्या रक्तातील AMH च्या पातळीचा अहवाल पाहून तुमच्या प्रजनन क्षमतेचा अंदाज लावतात आणि तुम्ही बाळाचं प्लॅनिंग कधी सुरू करावं हे सांगते.
AMH चाचणी कशी केली जाते?
एएमएच चाचणी रक्ताचा नमुना घेऊन केली जाते. यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान कोणत्याही दिवशी हे करू शकता.
advertisement
1.0-3.0 एनजी/एमएल : हा एक चांगला अंडी साठा मानला जातो.
0.5-1.0 एनजी/एमएल : याचा अर्थ असा की अंड्याचा साठा कमी आहे.
0.3 एनजी/एमएल पेक्षा कमी : याचा अर्थ असा की खूप कमी अंडी शिल्लक आहेत आणि यामुळे गर्भधारणेमध्ये समस्या येऊ शकतात.
3.5 एनजी/एमएल पेक्षा जास्त : याचा अर्थ असा की खूप जास्त अंडी आहेत, याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला पीसीओएस किंवा इतर हार्मोनशी संबंधित समस्या आहे.
advertisement
कमी AMH म्हणजे बाळाचं प्लॅनिंग करू शकणार नाही का?
AMH पातळी कमी असली तरीही तुम्ही प्रेग्नंट होऊ शकता, पण काही समस्या असू शकतात. AMH चाचणी तुमच्या प्रजनन क्षमतेचे संपूर्ण चित्र दाखवते. ती अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता दर्शवते. जर पातळी कमी किंवा जास्त असेल, तर तुम्ही लवकरच बाळाची योजना करावी आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
महिलांनी AMH चाचणी कधी करावी?
जर तुमचं वय 30 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल आणि तुम्ही सध्या बेबी प्लॅनिंग करत नसाल.
जर तुम्ही काही काळापासून प्रेग्नन्सीचा विचार करत असाल, पण ते करू शकत नसाल तर.
जर तुम्हाला PCOS, PCOD आणि अनियमित मासिक पाळीची समस्या असेल तर तुम्ही ही चाचणी करून घ्यावी.
advertisement
भविष्यात एग्ज फ्रिज करण्याच्या पर्यायांचा विचार करणाऱ्या महिलांसाठीदेखील ही चाचणी उपयुक्त आहे.
Location :
Delhi
First Published :
June 21, 2025 11:46 AM IST