नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI ने महिलेला केलं प्रेग्नंट, कसं काय?

Last Updated:

AI helps woman getting pregnant : आजकाल AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता अशी कामं करत आहे जी कधीकधी माणूस करू शकत नाहीत. आता मुलासाठी 19 वर्षे प्रयत्न करणारी महिला एआयच्या मदतीने प्रेग्नंट झाली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : मूल होण्यासाठी पुरुष आणि महिलांचं मिलन आवश्यक असतं. थेट शारीरिक संबंध नसले तरी आता आयव्हीएफमार्फत मूल होतं. पण एक अशी महिला तिला ना तिचा नवरा मूल देऊ शकत होता, ना आयव्हीएफमुळे तिला मूल होत होतं. गेली 19 वर्षे ही महिला मूल होण्यासाठी प्रयत्न करत होती. शेवटी एआयने तिचं स्वप्न पूर्ण केलं. एआयमुळे ही महिला प्रेग्नंट झाली. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल.
अमेरिकेतील हे कपल एक कपल गेल्या 19 वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत होतं.  या जोडप्यामध्ये पुरूषाला अ‍ॅझोस्पर्मिया नावाची वंध्यत्वाची समस्या होती. जी अमेरिकेतील एकूण वंध्यत्वाच्या 10 टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहे. अ‍ॅझोस्पर्मिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणू आढळत नाहीत किंवा ते इतके लहान आणि लपलेले असतात की मानवांना ते शोधणं कठीण होते. या समस्येची दोन कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया, म्हणजे जेव्हा शुक्राणूंच्या मार्गात अडथळा येतो. दुसरं म्हणजे नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे आपलं शरीर स्वतःहून शुक्राणू तयार करण्यास असमर्थ आहे.
advertisement
म्हणून या कपलने आयव्हीएफची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुमारे 15 वेळा आयव्हीएफ केलं पण ते फेल झालं. प्रत्येक वेळी त्यांना निराशाच मिळाली. शेवटी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील डॉक्टरांनी एआयच्या मदतीने असा चमत्कार केला आणि ती महिला प्रेग्नंट झाली.
advertisement
डॉक्टरांच्या मदतीने या कपलने 'स्टार' नावाची एक नवीन चाचणी घेतली. STAR म्हणजेच स्पर्म ट्रॅकिंग आणि रिकव्हरी. या चाचणीत एआयचा वापर करण्यात आला आहे. येथे AI ने असं काम केलं जे मानवी डोळे करू शकत नाहीत. STAR तंत्रज्ञानाने बनवलेलं हे मशीन 1 तासात 80 लाख फोटो काढू शकते. यात AI सर्वात लहान लपलेले शुक्राणू देखील शोधतं आणि नंतर हे शुक्राणू एका विशेष मशीनद्वारे सुरक्षितपणे वेगळे केले जातात. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डॉक्टरांना सुमारे 5 वर्षे लागली.
advertisement
STAR AI तंत्रज्ञानाचा वापर करून, डॉक्टरांनी पुरूषाच्या वीर्यामध्ये लपलेले निरोगी शुक्राणू काढले आणि यापैकी एक शुक्राणू अंड्यामध्ये टाकण्यात आला. दीर्घ प्रतीक्षेनंतर महिला गर्भवती राहिली. या जोडप्याला 19 वर्षांनी पालक होण्याचा आनंद मिळणार आहे.
advertisement
पुरुष आणि महिला दोघांमध्येही वंध्यत्व ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. जगभरात हजारो जोडपी आहेत ज्यांना पालक होण्याचा आनंद मिळत नाही. पण आता आयव्हीएफ आणि सरोगसीसारख्या वैद्यकीय तंत्रांनी ही समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवली गेली आहे. तरी काही प्रकरणांमध्ये आयव्हीएफदेखील यशस्वी होत नाही. इथं एआय आपली कमाल दाखवत आहे.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI ने महिलेला केलं प्रेग्नंट, कसं काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement