Pregnancy News : प्रेग्नंट महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी तसाच ठेवला मृतदेह, पुढे जे घडलं ते...

Last Updated:

Pregnant woman died : एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, पण डॉक्टरांनी तिला लाइफ सपोर्टवर जिवंत ठेवलं. कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही म्हणाल, त्यांनी योग्यच केलं. 

News18
News18
नवी दिल्ली : अनेकदा फिल्ममध्ये हे दृश्य पाहायला मिळतं जेव्हा प्रेग्नंट महिलेच्या पती आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितलं जातं की बाळ आणि आईपैकी फक्त एकालाच वाचवता येईल. अशा परिस्थितीत कोणाला वाचवायचं हे कुटुंबातील सदस्यांनी किंवा पतीने ठरवायचं असतं. अशीच प्रत्यक्ष परिस्थिती एका महिलेच्या बाबतीत घडली. प्रेग्नंट महिलेचं बाळ पोटात असताना मृत्यू झाला पण तिचा मृतदेह डॉक्टरांनी तसाच ठेवला.
अमेरिकेच्या जॉर्जियामधील ही घटना आहे. 30 वर्षांची एड्रियाना स्मिथ एक नर्स होती. तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. तेव्हा अॅड्रियाना अटलांटाच्या नॉर्थसाइड हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तिला औषध दिलं आणि घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं की तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं सीटी स्कॅनमध्ये तिच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या असल्याचं दिसून आलं. तिच्यावरील शस्त्रक्रियाही अयशस्वी झाली. डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केलं.
advertisement
फेब्रुवारीमध्ये तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. त्यावेळी ती 9 आठवड्यांची गर्भवती होती. आता ती 23 आठवड्यांची गर्भवती आहे. जॉर्जियाच्या कडक गर्भपात कायद्यांमुळे ती लाईफ सपोर्टवर आहे. जॉर्जिया कायद्यानुसार गर्भाच्या हृदयाचे ठोके आढळल्यानंतर गर्भपात होऊ शकत नाही. हे सहसा ६ आठवड्यांच्या आत घडतं. या कायद्याला लिव्हिंग इन्फंट्स फेअरनेस अँड इक्वॅलिटी (लाइफ) अॅक्ट असे म्हणतात. आईची स्थिती काहीही असो, गर्भाशयातील बाळाचं रक्षण करण्यासाठी कायदा आहे. अत्यंत दुर्मिळ प्रकरणात परिस्थिती काहीशी वेगळी बनली आहे.  यावेळी महिलेचा मृत्यू निश्चित होतं, परंतु गर्भ वाचवण्यासाठी तिला जबरदस्तीने लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.
advertisement
या प्रकरणामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. रुग्णालयाचं म्हणणं आहे की ते जॉर्जियाच्या गर्भपात कायद्याचं पालन करत आहे. डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितलं की ते अॅड्रियानाला उपकरणांमधून काढू शकत नाहीत. गर्भ वाचवण्यासाठी तिला ऑगस्टपर्यंत जिवंत ठेवावं लागेल. तोपर्यंत गर्भ 32 आठवड्यांचा असेल. त्या वेळी बाळाचा जन्म सिझेरियनद्वारे होईल.
advertisement
अॅड्रियानाच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की निर्णय त्यांच्या हातात असायला हवा होता. हा आमच्यासाठी छळ आहेय तिची आई एप्रिल न्यूकिर्क म्हणते, "मला माझी मुलगी श्वास घेताना दिसतेय, पण ती तिथे नाहीय. मुलाला हायड्रोसेफलस आहे. याचा अर्थ त्याच्या मेंदूत अतिरिक्त द्रव आहे. जन्मानंतर तो अंध होऊ शकतो. तो चालू शकणार नाही. तो कदाचित वाचणार नाही.
advertisement
हे प्रकरण अमेरिकेत चर्चेचा विषय बनले आहे. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की रुग्णालय कायदेशीर परिणामांना घाबरत आहे. म्हणूनच तो अॅड्रियानाला उपकरणांवर ठेवत आहे. त्याच वेळी बरेच लोक अॅड्रियानाला शांततेत मरू द्यावं यासाठी युक्तिवाद करत आहेत. हे प्रकरण आपल्याला वैद्यकीय नीतिमत्ता आणि वैयक्तिक हक्कांवर विचार करण्यास भाग पाडतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pregnancy News : प्रेग्नंट महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी तसाच ठेवला मृतदेह, पुढे जे घडलं ते...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement