बापरे! काय हे बाळ, नर्स-डॉक्टर पाहूनच थक्क, हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ त्याच्याच सेवेत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heavy weight baby : बाळाच्या जन्माची बातमी काही क्षणातच संपूर्ण रुग्णालयात पसरली. बाळाला पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले. सर्वजण मुलाची काळजी घेण्यात व्यस्त आहेत.
नवी दिल्ली : घरात नवा चिमुकला पाहुणा येणार म्हटल्यावर त्याची प्रतीक्षा घरातील प्रत्येक सदस्य पाहत असतो. राजस्थानातील असंच एक कुटुंब जे 9 महिन्यांपासून त्यांच्या घरात येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत होतं. अखेर तो क्षण आलाच. बाळाचा जन्म झाला. पण बाळाला पाहताच नर्स, डॉक्टर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. त्याला पाहून सगळे थक्क झाले आणि सगळे त्याच्याच सेवेला लागले.
अलवरच्या कठुमार भागातील जाडला गावातील रहिवासी आशा शर्माच्या पोटी हे बाळ जन्माला आलं आशाला शनिवारी सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला अलवर येथील काला कुआन येथील सॅटेलाइट रुग्णालयात आणण्यात आलं. तिची डिलीव्हरी झाली. बाळाचा जन्म झाला. पण बाळाला पाहून सगळे थक्क झाले. कारण बाळ वजनदार होतं.
advertisement
आशाने 5 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ आणि प्रसूती कक्षाचे प्रभारी डॉ. मनीष कुमार भारद्वाज यांनी सांगितलं की, देशात साधारणपणे 2.5 ते 3 किलो वजनाची बाळं जन्माला येतात आणि जास्तीत जास्त 4 किलो वजनाची बाळे जन्माला येतात. या बाळाचं वजन 5 किलो असल्याने त्याला विशेष निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. या मुलाचे खांदे थोडे मोठे आहेत त्यामुळे त्याला सतत निरीक्षणाखाली ठेवलं जाईल. बाळाचं वजन दुप्पट झाल्यावर त्याला भूकही जास्त लागेल. म्हणून आईच्या दुधाशिवाय इतर गोष्टींनी त्याचं पोट भरण्याचा प्रयत्न केला जाईल. भारद्वाज म्हणाले की, आई आणि नवजात दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत.
advertisement
एका जम्बो बाळाच्या जन्माची बातमी काही क्षणातच संपूर्ण रुग्णालयात पसरली. त्या वजनदार बाळाला पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले. सर्वजण मुलाची काळजी घेण्यात व्यस्त आहेत. संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी देखील नवजात बाळाची सेवा करण्यात गुंतलेले आहेत. या बाळाच्या जन्माची बातमी नंतर सोशल मीडियावरही पसरली.
advertisement
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, सर्वात वजनदार बाळाचा जन्म 1955 मध्ये इटलीमध्ये झाला होता, त्याचं वजन 22 पौंड म्हणजेच सुमारे 10 किलो होतं.
Location :
Rajasthan
First Published :
March 23, 2025 1:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बापरे! काय हे बाळ, नर्स-डॉक्टर पाहूनच थक्क, हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ त्याच्याच सेवेत