advertisement

Success Story : शेतमजूर महिलेनं करून दाखवलं, उभारला चिवड्याचा व्यवसाय, महिन्याला लाखभर कमाई

Last Updated:
रुक्मिणी चौधरी यांचा आज स्वतःचा गृहउद्योग असून त्या चिवडा विक्री करतात. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहीकाळ शेतमजुरी केली.
1/5
आज अनेक महिला स्वतःच्या पायावर व्यवसाय सुरू करताना दिसत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले जातात. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावच्या रुक्मिणी चौधरी यांनीही असाच एक व्यवसाय केला असून त्यांना यामधून वर्षाला लाखोंची कमाई होत आहे.

2/5
रुक्मिणी चौधरी यांचा आज स्वतःचा गृहउद्योग असून त्या चिवडा विक्री करतात. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहीकाळ शेतमजुरी केली. एकदा शेतात कामाला जाण्यास थोडा उशीर झाला, म्हणून मालकाने त्यांना कामावरून परत पाठवले. या घटनेने त्या मनातून खचल्या, मात्र घरी परतल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला.
रुक्मिणी चौधरी यांचा आज स्वतःचा गृहउद्योग असून त्या चिवडा विक्री करतात. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहीकाळ शेतमजुरी केली. एकदा शेतात कामाला जाण्यास थोडा उशीर झाला, म्हणून मालकाने त्यांना कामावरून परत पाठवले. या घटनेने त्या मनातून खचल्या, मात्र घरी परतल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला. "दुसऱ्याच्या शेतात काम करण्यापेक्षा घरातच काहीतरी व्यवसाय सुरू कर,” हा वडिलांचा सल्ला ऐकला आणि त्यांचं आयुष्य बदललं.
advertisement
3/5
त्यानंतर त्यांनी घरीच चिवडा बनवायला सुरुवात केली. गेल्या 10-15 वर्षांपासून त्या चिवडा बनवत आहेत. यामध्ये मक्याचा चिवडा, पोह्यांचा चिवडा, शेव चिवडा, शेंगा चटणी, डिंक लाडू, शेंगा लाडू हे सर्व पदार्थ त्या स्वतः तयार करतात. त्यांच्या चिवड्याची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. 15 रुपयांच्या पाकिटापासून ते 300 रुपये किलोपर्यंत चिवडा त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

4/5
रुक्मिणी चौधरी या केवळ उत्पादन करून थांबल्या नाहीत. या चिवड्याची त्या स्वतः मार्केटिंग करतात. यामध्ये लांबोटी गावासह मोहोळ-पंढरपूर महामार्ग आणि सोलापूर-पुणे महामार्गावर थांबून चिवडा विक्री करतात. त्यांच्या चिवड्याची चव इतकी प्रसिद्ध झाली आहे की, आजूबाजूच्या कुरुल, कामती, बीबी दारफळ आणि पाकणी यांसारख्या गावांतील नागरिक आवर्जून लांबोटीला चिवडा खरेदीसाठी येतात. चिवडा विक्रीच्या व्यवसायातून महिन्याला 1 ते 1.50 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.

5/5
रुक्मिणी चौधरी इतर महिलांना सांगतात की, प्रत्येक गृहिणी महिलेने घराबाहेर पडून काहीतरी स्वतःचे काम करावे. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते.

Tips And Tricks : फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
View All
advertisement