म्हणे, 'ही देवाची देणगी'! 66व्या वयात महिला प्रेग्नंट, 10 मुलांना दिला जन्म
- Published by:Priya Lad
Last Updated:
66 Year old woman pregnancy news : महिला नैसर्गिकरित्या गर्भवती झाली आणि तिने यासाठी आयव्हीएफ किंवा इतर कोणत्याही तंत्राची मदत घेतली नाही.
वयानुसार मातृत्वाचा प्रवास अधिक कठीण होतो. पण अलीकडेच एका 66 वर्षीय महिलेने जगाला धक्का दिला आहे. या महिलेने वयाच्या 66 व्या वर्षी दहाव्या मुलाला जन्म दिला आहे. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. ज्या वयात महिला आजी होतात नातवंडं खेळवतात. त्या वयात महिला दहाव्या मुलाला जन्म देते हे वाचूनच तुम्ही थक्क झाला असाल.
advertisement
advertisement
अलेक्झांड्राने 45 वर्षांपूर्वी 1977 साली तिच्या पहिल्या मुलाला स्वेतलानाला जन्म दिला आणि नंतर 50 वर्षांच्या वयानंतरही तिने अनेक मुलांना जन्म दिला. आता वयाच्या 66 व्या वर्षी तिने तिच्या दहाव्या मुलाला जन्म देऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. तिने नुकतंच 19 मार्च रोजी बर्लिनमधील चॅरिट हॉस्पिटलमध्ये निरोगी बाळाला जन्म दिला आहे. ज्याचं वजन 3.54 किलो आहे. महिलेने बाळाचं नाव फिलिप ठेवलं आहे.
advertisement
महिला नैसर्गिकरित्या गर्भवती झाली आणि तिने यासाठी आयव्हीएफ किंवा इतर कोणत्याही तंत्राची मदत घेतली नाही.अलेक्झांड्रा म्हणते, "मी नेहमीच खूप निरोगी जीवनशैली पाळली आहे. मी दररोज एक तास पोहते, दोन तास धावते, दारू पित नाही किंवा धूम्रपान करत नाही. मी कधीही गर्भनिरोधक वापरलेलं नाही. ही देवाची देणगी आहे आणि मी तो एक आशीर्वाद मानते.'
advertisement
मातृत्वाचा तिचा प्रवास जवळजवळ पाच दशकांचा आहे. ही बातमी इंटरनेटवर व्हायरल झाली आहे आणि लोक यावर कमेंट करू लागले. काही लोक याला 'चमत्कार' मानत आहेत, तर काही लोक याला वैद्यकीयदृष्ट्या धोकादायक निर्णय म्हणत आहेत. तर काहींनी महिलेचं कौतुक केलं आहे. महिलेच्या अद्भुत धैर्याला आणि मातृत्वाच्या भावनेला सलाम करत आहेत. (सर्व फोटो प्रतीकात्मक)