advertisement

जयंत पाटलांना मोठा धक्का, माजी मंत्री राहिलेले भाचेबुवा राहुरी पोटनिवडणुकीआधी भाजपमध्ये जाणार?

Last Updated:

दिवंगत नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांत होणार आहे.

प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे
(राहुरी) अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मला आमदार व्हायची काही घाई नाही, अक्षय कर्डिले यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य केल्याने तनपुरे लवकरच भारतीय जनता पक्षाची वाट धरणार असल्याच्या चर्चा राहुरीत आहेत. राहुरीची पोटनिवडणूक काही दिवसांत लागणार आहे. त्यापूर्वीच तनपुरे पक्षबदल करणार असल्याचे संकेत मिळताहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे तनपुरे हे भाचे आहेत. तनपुरे यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर जयंत पाटील यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल.
दिवंगत नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांत होणे अपेक्षित आहे. निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली असताना मला आमदार व्हायची घाई नाही, असे विधान प्राजक्त तनपुरे यांनी केल्याने राहुरीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दुसरीकडे तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने अस्वस्थ झालेल्या अक्षय कर्डिले यांनी मुंबईत येऊन भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
advertisement

प्राजक्त तनपुरे यांच्याकडून भाजप प्रवेशाचे उघड उघड संकेत? पवारांची राष्ट्रवादीही सरकारमध्ये जाणार?

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे यांनी वेषभूषा बदलली आहे. गळ्यात भगवा पंचा आणि भगवी टोपी घालून ते मतदारसंघात दिसत आहेत. तसेच अक्षय कर्डिले यांच्यासोबत जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहेत.
advertisement
प्राजक्त तनपुरे यांची एक चित्रफित समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यामध्ये अक्षय कर्डिले यांना आमदार होण्यासाठी ते शुभेच्छा देत आहेत. आमचे १० आमदारही सरकारमध्ये जाऊ शकतात, त्यामुळे सरकार आपलेच आहे. सरकारला २५० आमदारांचा पाठिंबा आहे, माझे काय मलाही माहिती नाही, अशी फटकेबाजी त्यांनी केली. त्यावेळी अक्षय कर्डिले त्यांच्या शेजारीत उभे होते. त्यांनी याच भाषणात शरद पवार यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत दिले तसेच त्यांच्याही भाजप प्रवेशाविषयी सूचकपणे वक्तव्य केले.
advertisement

अक्षय कर्डिले यांचा मुंबई दौरा, भाजप नेत्यांशी चर्चा

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान अक्षय कर्डिले यांनी मुंबई येऊन भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. पक्षाच्या उमेदवारीसाठी आणि तनपुरे यांच्या प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अक्षय कर्डिले यांनी भाजप नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती मिळते आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

advertisement
दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबद्दल पक्षाला आदर असेल तर अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अक्षय कर्डिले यांना डावलून दुसऱ्या कुणाला पक्षाने उमेदवारी दिली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत.
advertisement

कोण आहेत प्राजक्त तनपुरे?

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदारही आहेत
२०१९ साली शिवाजीराव कर्डिले यांना त्यांनी पराभूत केले
२०१९ सालीच ते महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री झाले
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जयंत पाटलांना मोठा धक्का, माजी मंत्री राहिलेले भाचेबुवा राहुरी पोटनिवडणुकीआधी भाजपमध्ये जाणार?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement