advertisement

Sanju Samson : मैदानात सव्वा लाख लोक, पण आई पाहू शकली नाही संजूची बॅटिंग, कारण वाचून डोळ्यात पाणी येईल!

Last Updated:

संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप विजयाचा खरा हिरो ठरला, पण संजू सॅमसनच्या आईला इच्छा असूनही स्टेडियममध्ये येऊन मुलाची बॅटिंग पाहता आली नाही.

मैदानात सव्वा लाख लोक, पण आई पाहू शकली नाही संजूची बॅटिंग, कारण वाचून डोळ्यात पाणी येईल!
मैदानात सव्वा लाख लोक, पण आई पाहू शकली नाही संजूची बॅटिंग, कारण वाचून डोळ्यात पाणी येईल!
तिरुवनंतपूरम : संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप विजयाचा खरा हिरो ठरला. वेस्ट इंडिजविरुद्धचा करो या मरोचा सामना, इंग्लंडविरुद्धची सेमी फायनल आणि न्यूझीलंडविरुद्धची फायनल, अशा लागोपाठ 3 सामन्यांमध्ये संजू सॅमसनने 3 अर्धशतकं केली. या कामगिरीबद्दल संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. संजूच्या या कामगिरीबद्दल त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संजू सॅमसन अहमदाबादमधून थेट त्याच्या घरी तिरुवनंतपूरमला गेला. घरी पाय ठेवताच संजूला त्याच्या आई-वडिलांनी कडकडून मिठी मारली आणि त्याचं घरात स्वागत केलं. संजू जेव्हा घरी आला तेव्हा त्याची आई लिझ विश्वनाथ यांना अश्रू अनावर झाले. मागच्या आठवड्याभरापासून संजूची आई लिझ विश्वनाथ यांच्या छातीमधल्या संसर्गाचा त्रास होत होता, त्यामुळे संजूची आई आणि वडिलांना फायनल पाहण्यासाठी अहमदाबादला जायची इच्छा असूनही जाता आलं नाही.
advertisement
'मी फायनल मॅचवर लक्ष ठेवून होते. संजूला रन करताना पाहिलं, नंतर माझ्या मुलाला प्लेअर ऑफ द वर्ल्ड कप घोषित केलं, हे ऐकून मला आणखी आनंद झाला', अशी प्रतिक्रिया संजूच्या आईने दिली. तब्येत बरी नसल्यामुळे संजूची आई आणि वडील घरातूनच मॅच पाहत होते, तर संजूची पत्नी चारुलता स्टेडियममध्ये होती.

मॅचआधी संजूचा आईला फोन

advertisement
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी संजूने आईला फोन केला होता, तसंच तब्येतीची काळजी घ्यायलाही सांगितलं होतं. फायनल झाल्यानंतर संजू लगेचच घरी आला, घरात पाय ठेवताच संजूने सगळ्यात आधी आई-वडिलांना मिठी मारली आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson : मैदानात सव्वा लाख लोक, पण आई पाहू शकली नाही संजूची बॅटिंग, कारण वाचून डोळ्यात पाणी येईल!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement