advertisement

सावधान! गॅसचा काळाबाजार केल्यास थेट तुरुंगाची हवा; साठेबाजांना सरकारचा इशारा

Last Updated:

घरगुती गॅस सिलेंडरचाही काळाबाजार सुरू झालाय. 900 ते अकराशे रुपयांपर्यंत मिळणारा घरगुती सिलेंडर आता अठराशे ते दोन हजार रुपयांना विकला जातोय.

News18
News18
मुंबई :  संकटकाळात साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही. कारण गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाईला सुरू झालीय. युद्धामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काळाबाजार सुरू झालाय. दोन हजारांना मिळणारा कमर्शियल सिलेंडर आता थेट चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलाय. हा काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लागलीय
राज्यात कमर्शिअल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबई, नागपूर, पुण्यासह सर्वच शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक हवालदिल झालेत. त्यातच कमर्शिअल गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली. 1800 ते 2000 हजार रुपयांना मिळणारा कमर्शिअल गॅस सिलेंडर आता साडेतीन हजार ते 4 हजार रुपयांना विकला जातोय. घरगुती गॅस सिलेंडरचाही काळाबाजार सुरू झालाय. 900 ते अकराशे रुपयांपर्यंत मिळणारा घरगुती सिलेंडर आता अठराशे ते दोन हजार रुपयांना विकला जातोय.
advertisement

सिलेंडरचा साठा करण्यावर भर देणाऱ्यांवर कठोर कारवाई

त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांकडून सिलेंडरचा साठा करण्यावर भर दिला जातोय. मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे राज्यातील गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे.
नागपूरमध्ये सदर परिसरातील एका गॅस एजन्सी कार्यालयात पुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसंच गोडाऊनमध्ये जाऊन स्टॉक आणि वितरणाचा ताळमेळ तपासला. अवैध साठा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement

काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

काळाबाजार करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात गॅस वितरणावर प्रशासनाचं अधिक लक्ष राहणार आहे. तर गॅस सिलेंडर लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जातेय.
आखाती देशांतील या तणावामुळे भारताच्या स्वयंपाकघरावर काय परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिक तर आता गॅसअभावी किचन बंद करण्याच्या तयारीत आहेत.
advertisement

व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली

राज्यातील गॅस तुटवडा आणि वाढते दर यामुळे नागरिक, व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी प्रशासनानं काळाबाजार थांबवण्यासाठी घेतलेली मोहीम प्रभावीपणे राबवली तर सामान्य नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल.
हे ही वाचा :
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सावधान! गॅसचा काळाबाजार केल्यास थेट तुरुंगाची हवा; साठेबाजांना सरकारचा इशारा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement